शिरूरमधील आंदोलनाला संघटनांचा पाठिंबा

शिरूरमधील आंदोलनाला संघटनांचा पाठिंबा

Published on

शिरूर, ता. ११ : शहरातील अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणे व बेकायदा वृक्षतोडीकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी येथील नगर परिषद कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. १०) सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
शिरूर शहरातील अनधिकृत बांधकाम व अनधिकृत हॉटेल व्यवसायाला आळा घालावा, एका सोसायटीतील बेकायदा वृक्षतोडीची चौकशी करून दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी सय्यद हे कालपासून नगर परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत. मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे व संदीप कडेकर, मनसे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रवीराज लेंडे, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसे रस्ते अस्थापना विभागाचे तालुकाध्यक्ष सुदाम चव्हाण हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
दरम्यान, या आंदोलनाला भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, भाजपचे तालुका संपर्क प्रमुख बाबूराव पाचंगे, भारतीय बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक नाथा पाचर्णे, राष्ट्रवादी कॉंग्रेस लीगल सेलचे शहराध्यक्ष ॲड. रवींद्र खांडरे, शिरूर कुंभार समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब जामदार, रूस्तूम सय्यद, सतिश संघवी, संदीप गावडे, मुक्तार शेख, लाला दुधाणे, मनोज ढवळे, अरबाज काझी, हर्षद ओस्तवाल यांनी पाठिंबा दर्शविला.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन कार्यवाहीचे अश्वासन दिले. मात्र, ठोस कारवाईशिवाय उपोषण न थांबविण्याचा निर्धार सय्यद यांनी व्यक्त केला.

शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी असलेल्या शिरूर शहर विकास आघाडीच्या सचिवांनी व विरोधी लोकशाही क्रांती आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्याने अनधिकृत बांधकाम करून हॉटेल व्यवसाय थाटला आहे. आम्ही केलेल्या तक्रारीनंतर नगर परिषदेने त्यांना व्यावसायिक वापर थांबविण्याबाबत नोटीस बजावलेली असतानाही त्यांचा वापर बिनदिक्कतपणे चालू आहे. याबाबत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने त्यांना नोटीस बजावू असे सांगणे हे अनाकलनीय आहे.
- महिबूब सय्यद, उपाध्यक्ष, मनसे, पुणे जिल्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.