शिरूरमध्ये अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

शिरूरमध्ये अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

शिरूर, ता. २१ : पुणे-नगर रस्त्यावर शिरूर येथे अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी (ता.२१) पहाटे ही घटना घडली होती. राणी दादाभाऊ मलगुंडे (वय ३३, रा. बाबुरावनगर, शिरूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळ ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील रहिवासी असलेल्या मलगुंडे या गेल्या काही दिवसांपासून शिरूर बायपास नजीक बाबूराव नगरमध्ये पती व मुलांसह राहत होत्या. मध्यरात्री तीनच्या सुमारास त्यांना बायपासवर एका मोटारीची धडक बसली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. वाहनचालकाने स्थानिकांच्या मदतीने त्यांना शिरूरमधील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रूग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी पुण्यातील रूग्णालयात घेऊन जात होते. शिक्रापूरजवळ त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने तेथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राणी मलगुंडे यांचे बंधू सागर सिताराम देवकाते (रा. शिरूर) यांनी याबाबतची माहिती शिरूर पोलिसांना दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com