शिरूर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर घंटानाद

शिरूर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर घंटानाद
Published on

शिरूर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर घंटानाद
शिरूर, ता. १७ : प्रशासन काळात नगर परिषदेत भोंगळ कारभार सुरू असून, गेल्या चार वर्षात तिजोरी खाली करूनही नागरीकांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली नसल्याचा आरोप करीत महाविकास आघाडी आणि सहयोगी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता.) निषेधाच्या घोषणा देत शिरूर नगर परिषद कार्यालयासमोर घंटानाद केला. हे इशारा आंदोलन असून, यानंतरही कारभारात सुधारणा न झाल्यास आणि नागरीकांना वेळेत सेवासुविधा न मिळाल्यास याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, कार्याध्यक्ष हाफीज बागवान, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष गीता आढाव, शिवरत्न प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष थेऊरकर, संघटक योगेश पवार, भीमछावा संघटनेचे अध्यक्ष चेतन साठे, लहुजी शक्ती सेनेचे शहर अध्यक्ष विशाल जोगदंड, शिरूर कुंभार समाज संघटनेचे अध्यक्ष योगेश जामदार, खिदमत फाउंडेशनचे विश्वस्त आबीद उर्फ मुन्ना शेख, महाराष्ट्र राज्य पैलवान फाउंडेशनचे उपाध्यक्ष अशोक पवार, कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अजीम सय्यद, ॲड. रवींद्र खांडरे, मंगेश खांडरे, राहिल शेख, युवराज सोनार, कलिम सय्यद, अक्षय सोनवणे, विराज आढाव, आदित्य उबाळे, राणी कर्डिले आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका न झाल्याने नगर परिषदेत नगराध्यक्ष, नगरसेवक कार्यरत नाहीत. नगर परिषदेत गेल्या चार वर्षांपासून प्रशासक राज असून प्रशासनावर कुणाचाही अंकुश नसल्याने मुख्याधिकारी एकाधिकारशाहीप्रमाणे नगर परिषदेचे कामकाज करीत आहेत, असा आरोप कुरेशी यांनी केला. नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, स्वच्छता निरीक्षक डी. टी. बर्गे, आदित्य बनकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.


प्रशासन काळात अनेक विकास कामांना गती दिलेली असून, नगर परिषदेतील कामे नियमानूसार चालू आहेत. आंदोलनकर्त्यांनाही याबाबत सविस्तर उत्तरे देऊन अवगत केले होते. नगर परिषदेने कुठलीही बाब लपवून ठेवलेली नाही. याउपर काही तक्रारी असतील तर समोरासमोर चर्चेची प्रशासनाची तयारी आहे.
- प्रीतम पाटील, मुख्याधिकारी, शिरूर नगर परिषद


05636

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com