पुणे
कर्करोगाविषयी शिरूरमध्ये व्याख्यान
शिरूर, ता. ४ : कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ५) कर्करोग विषयातील तज्ज्ञ डॉ. भूषण भळगट यांचे ‘कॅन्सर ला घाबरू नका : माहितगार बना व सुरक्षित रहा’ या विषयावर व्याख्यान होत आहे.
युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांचा ५९ वा जन्मदिवस, प्रमोदसुधाजी महाराज यांची जन्मजयंती, स्नेहप्रभाजी महाराज यांचा स्मृतीदिन आणि खान्देश केसरी गौतममुनीजी महाराज यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त, चेतनमुनीजी महाराज यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या व्याख्यानावेळी डॉ. भळगट उपस्थितांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. येथील पंचायत भवन मधील मातोश्री कंचन शांतीलालजी दुगड धर्मसभा मंडपात उद्या सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या जनजागृतीपर सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे संघपती भरत चोरडिया यांनी केले आहे.