पुणे
शिरूर बातमी वाढावा
रांजणगाव एमआयडीसी परिसरात रोजगाराच्या निमीत्ताने परप्रांतिय तसेच परजिल्ह्यातील कामगारांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली असून या कामगारांना लुटीचे, मारहाणीचे, दमदातीचे प्रकार वारंवार घडत असून छोट्यामोठ्या गुन्ह्यांचे प्रमाणही गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. आज खून झालेले सिद्दीकी हाजी यांच्यासह त्यांचे तीन बंधू रांजणगाव एमआयडीसीतील छोट्यामोठ्या कंपन्यात काम करून उदरनिर्वाह करतात. चैतन्यनगर (नांदेड) येथील मूळचे रहिवासी असलेले हे हाजी कुटुंब असून एकूण पाच भाऊ आहेत. अत्यंत जड अंतःकरणाने या कुटुंबाने सिद्दीकी मोहम्मद मुजम्मील यांची मृतदेह मूळगावी नेला. या घटनेने परिसरातून ही हल्लेखोरांबाबत संतापाच्या प्रतिकिया उमटल्या.
नितीन बारवकर, शिरूर बातमीदार