पुणे
तडीपार गुंडाची येरवडा कारागृहात रवानगी
शिरूर : माझ्या हद्दीत काम करायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करून शासकीय बांधकाम कंत्राटदारास व त्याच्या कामगारांस हातपाय तोडण्याची धमकी देत शिवीगाळ करणाऱ्या अभिषेक हनुमान मिसाळ ऊर्फ घ्या (रा. सोनार आळी, शिरूर) याला पोलिसांनी अटक केली. तो तडीपार गुंड असून, त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. संतोष तुकाराम वाखारे यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी मिसाळविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्याला अटक करून शिरूर न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावल्याने त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके करीत आहेत.

