
सासवड येथे उद्योग, धंदे ठप्प
सासवड, ता.४ : वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेच्या संपामुळे आज (ता.४) पहिल्याच दिवशी जनजीवन विस्कळित होण्यास सुरवात झाली. पुरंदर तालुक्यातील विद्युत पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या अनेक उद्योग, धंद्यांना, व्यवसाय ठप्प झाले. यामुळे नागरिक मेटाकुटीला आले. जिथे जनरेटर्स, इन्व्हीटर्स नाहीत.. असे व्यावसायिक पुरते वैतागले. ज्यांच्याकडे जनरेटर्स, इन्व्हीटर्स आहेत.. तेही रात्री गप्पगार झाले. सासवडचा पाणी पुरवठा पहिल्याच दिवशी विस्कळित झाल्याचेही दिसत आहे.
सासवड (ता.पुरंदर) येथील व परीसरातील वीज पुरवठा सकाळीच खंडीत झाला. तो पूर्ववत करण्यास कोणीही यंत्रणा नसल्याने रात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. सासवड येथील पुरंदर तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय चव्हाण, दुकानदार संघटनेचे अध्यक्ष उमेश जगताप यांनी सांगितले की, एकीकडे भांडवलादारांना प्राधान्य देणाऱ्या सरकारच्या निषेर्धात वीज कर्मचाऱ्यांचा संप योग्य असला तरी सामान्य लोक व व्यावसायिकांचे प्रचंड हाल झाले.. सरकारने लवकर तोडगा काढावा.