एका वादळाची वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एका वादळाची वाटचाल
एका वादळाची वाटचाल

एका वादळाची वाटचाल

sakal_logo
By

एका वादळाची वाटचाल

आमदार संजय जगताप यांचा विकासाचा चढता आलेख आपणासमोर मांडताना मला व्यक्तिगत मनस्वी आनंद होत आहे. अशा या दानशूर कर्मवीर दमदार हवेलीतील आबालवृद्धांचा श्रावण बाळअसलेल्या आमदार संजय जगताप यांचा आज वाढदिवस, त्यांना पुरंदर-हवेलीतील जनतेच्याच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा....

- अनिल महादेव उरवणे,
सरव्यवस्थापक, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था, सासवड

आदरणीय आमदार संजयजी जगताप यांचा १५ जानेवारी १९७६ रोजी जन्म झाला. शिक्षण पूर्ण होताच त्यांचे पिताश्री चंदुकाका जगताप यांनी ज्या लोकांचे संघटन करून तालुक्यात सामाजिक राजकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले, त्याचा धागा पकडून या एका झंझावती वादळाचा उदय झाला. एक तेजस्वी तारा चमकला. ९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण, हा ध्यास मनात ठेवून आमदारसाहेबांनी आपल्या समाजसेवेची गुढी उभारली. तळागाळातील गोरगरीब समाजाची परिस्थितीने पिचलेल्या सामान्य माणसाची अचूक नाडी त्यांनी ओळखली
सावकाराच्या दारात जाऊन आपला सात-बारा लिहून देणाऱ्या शेतकऱ्यांना आज कशाची गरज आहे, हे ओळखून सहकार क्षेत्रात सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून ज्या व्यक्तींना कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नव्हती, असे बेरोजगार तरुण, शेतमजूर, भाजीविक्रेते, फळविक्रेते, लघुउद्योग यांना त्यांच्या व्यवसायवाढीसाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत निकडीच्या वेळी मदत करण्याच्या उद्देशाने, त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना बचतीची सवय वाढवण्याच्या हेतूने संत सोपानकाका सहकारी बँक ९ एप्रिल १९९७ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नोंदणी करून २८ नोव्हेंबर १९९७ रोजी परम पूज्य नारायण महाराज आणि लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते बँकेचा दिमाखदार उद्‍घाटन सोहळा पार पडला. बँकेच्या १८ शाखा व एक मुख्य प्रशासकीय कार्यालय असून, आता शाखांमध्ये ६२५ कोटी ठेवींचा पट्टा टप्पा घातला आहे. ३७५ कोटींचे कर्ज व्यवहार असून, निव्वळ नफा ३ कोटी ७३ लाख रुपये आहे
पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना सहकार महर्षी नामदार चंदुकाका जगताप यांनी सन १९८८ मध्ये केली. आज या संस्थेचे ११ हजार ४८ सभासद असून, २५० कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी आहेत. जवळपास ६ कोटी वसूल भागभांडवल १२ कोटी रुपयांचा स्वस्वनिधी आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी पुरंदर मिल्क ॲंड ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेड या संस्थेची स्थापना करून तालुक्‍यात गावोगावी दूध संकलन केंद्र उभी केली. त्यातून कित्येक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला व शेतकऱ्यांना शेतकरी जोडधंदा उभा करून त्यांच्या संसाराला हातभार लावला. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी सभासदांना दिवाळीत डिव्हिडंड रूपाने एक किलो तुपाचे वाटप केले जाते, ही परंपरा संस्था स्थापनेपासून आजतागायत अखंडित आहे.
केवळ दूध व्यवसायासारखा जोड धंदा करून हा शेतकरी व राहणार नसून, त्याच्या मुख्य शेतीव्यवसायाला योग्य बी बियाण्यांचा पुरवठा ते त्याची विक्री व्यवस्थेपर्यंत येणाऱ्या अडचणी याची जाणीव घेऊन त्यांनी रोपवाटिकेपासून स्टोरीजपर्यंत नियंत्रणाची उभारणी केली. त्यामुळे उत्तम प्रतीचे बियाणे शेतकऱ्यांना मिळू लागले. तसेच, बाजारमूल्य वाढेपर्यंत शेतमाल साठवण्याची सुविधा मिळाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला.
ज्ञानाची गंगा घराघरापर्यंत पोचवण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून खेड्यापाड्यात विद्यालयाची स्थापना करून या शिक्षण संस्थेच्या सचिवपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळण्यात आली. आज या संस्थेची २७ विद्यालय आहेत. एवढे करूनही माणूस थांबला नाही, तर ज्यांना आर्थिक परिस्थितीने पवित्र तीर्थस्थानाचे दर्शन घेता येत नव्हती, अशा सामान्य जनतेला काशी-रामेश्वर; तर मुस्लिम बांधवांना अजमेर या पवित्र तीर्थस्थानाचे दर्शन स्वखर्चाने घडवण्याची पवित्र कार्य पार पाडले. यापुढे बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा त्यांचा मानस आहे. यात आतापर्यंत सहा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडविण्यात यांचा मोलाचा वाटा आहे.
सासवड सांस्कृतिक मंडळ स्थापन करून महिला भगिनींच्या कला कर्तृत्वाला व्यासपीठ निर्माण करून दिले. पुरंदरच्या संस्कृती विकासाला गती दिली. सासवड सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून पुरंदर- हवेलीमध्ये किल्ले स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भजन स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, अशा विविध स्पर्धा घेऊन मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.
माजी आमदार स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त संत सोपानकाका मंदिराच्या प्रांगणात भव्य भजन स्पर्धा आयोजित केली होती. पुरंदर-हवेली तालुक्यातील भजनी
मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला.
शिवाजी व्यायाम मंडळ स्थापन करून पुरंदर केसरी स्पर्धेचे आयोजन करून तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण केली. त्याकरता गावागावांमध्ये आधुनिक व्यायामशाळा, व्याख्याने, शिवाजी व्यायाम मंडळाचा एक तरी मल्ल महाराष्ट्र केसरी व्हावा, हे स्वप्न त्यांना पूर्ण करायचे आहे. त्यासाठी ते तालुक्यातील मल्लांना प्रशिक्षण व खुराक स्वखर्चाने करीत आहेत. सन २००७पासून तेरा मल्लांनी पुरंदर केसरी, लाल मातीचा राजा हा किताब पटकावला आहे.
संत सोपानकाका सहकारी बँक, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था, या दोन्ही अर्थवाहिन्यांच्या माध्यमातून पुरंदर-हवेलीतील आपल्या कर्तृत्वाने जगाच्या कानाकोपऱ्यात नाव पोहोचवणाऱ्या मान्यवरांचा मायभूमीत गौरव हवा, त्यासाठी या संस्थांच्या माध्यमातून पुरंदर भूषण व सोपान काका भक्ती पुरस्कार २००२ पासून कार्यान्वित आणला. त्यामुळे पुरंदर-हवेलीतील कर्तुत्वान व्यक्ती व संस्था यांची दखल घेतली जाऊ लागली.
ग्रामीण संस्थेच्यावतीने पुरंदर-हवेली तालुक्यातील फुरसुंगी, होळकरवाडी, उरुळी देवाची, वडकी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी, शेवाळवाडी, भेकराईनगर; तर पुरंदर तालुक्यातील धालेवाडी, जेऊर, मावडी क.प. या गावांमधील १२ हजार ४०० महिलांना ग्रामीण आरोग्य स्मार्ट कार्डचे वाटप करून या मोफत सुविधा देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटाचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी व त्यांना विशेष मार्गदर्शन मिळावे व प्रशिक्षण शिबिर आदीचे आयोजन करण्यात येते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी इंदिरा महिला नागरी पतसंस्थेमार्फत गरीब गरजू महिलांना बचत गटांना आर्थिक साह्य केले जाते. १५ ऑगस्ट २०१९ रोजी पुरंदर तालुक्यातील ६४० सेवेत असणाऱ्या सैन्यदलातील जवानांच्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी १ लाख भाकरी-चटणी तसेच जीवनावश्यक वस्तू देण्यात आले.

सासवडचा विकास प्रगतिपथावर
सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यावेळेस सासवडकर नागरिकांनी आमदार संजय जगताप यांच्यावर विश्वास टाकून एक हाती सत्ता दिली, तेव्हापासून प्रत्येक वॉर्डात विकासाची कामे भरपूर झाली. सासवड स्वच्छ व सुंदर करून स्वच्छता अभियानात सासवड नगरपालिकेस राज्य व देश पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त झाला. हे सर्व घडू शकले, ते आमदार संजय चंद्रकांत जगताप यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे. सासवड नगरीच्या नैसर्गिक भौगोलिक रचनेचा विचार करून ५८ कोटी १३ लक्ष रुपयांचे भुयारी गटार योजना मंजूर करून काम सुरू केले. केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१० घरकुलांची मंजुरी घेऊन जवळपास पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घरकुलाच्या काही लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. या योजना आज सासवडमध्ये प्रगतिपथावर आहे.

कोरोनात मोठे काम
संजय जगताप हा माणूस पुरंदर-हवेलीच्या तळागाळात गावागावात घराघरांत पोहोचला. जनतेच्या काळजात या माणसाने घर केलं. त्याचीच परतफेड म्हणून पुरंदर-हवेलीच्या जनतेने ३२ हजारच्या प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठविले. परंतु, जवळजवळ एक वर्षाच्या कालावधीत संपूर्ण जगावर कोरोनासारख्या महामारीमुळे मोठे संकट कोसळले होते. त्यातून पुरंदर-हवेली जनतेला सावरण्यासाठी, कोणीही उपाशी राहू नये म्हणून दररोज दोन वेळा १७ हजार ९०० लोकांना ५२ दिवस मोफत घरपोच देण्याचा मोठे काम आमदार संजय जगताप यांनी केले. त्याचबरोबर १९ हजार कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे किराणाचे वाटप केले. सॅनिटायझर, एन ९५ मास्क, पीपीई कीट वाटप केले. त्याचप्रमाणे ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष सौ. राजनंदिनीताई संजय जगताप यांनी ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून दररोज पाच हजार लिटर आनंदी दुधाचे मोफत वाटप केले. तत्कालीन आरोग्यमंत्री माननीय नामदार राजेशजी टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आमदार संजय जगताप यांनी पुरंदर-हवेली तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करून दहा हजार रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिले.