पुरंदर शैक्षणिक संकुलात अवतरला `देव माणूस` | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदर शैक्षणिक संकुलात अवतरला `देव माणूस`
पुरंदर शैक्षणिक संकुलात अवतरला `देव माणूस`

पुरंदर शैक्षणिक संकुलात अवतरला `देव माणूस`

sakal_logo
By

सासवड, ता.३० : येथील (ता.पुरंदर) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सासवड येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील व मराठी मालिका `देव माणूस` मुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते किरण गायकवाड यांनी नुकतीच उपस्थिती लावली. पुरंदर हायस्कूलच्या प्रांगणात अवतरलेल्या या `देव माणूसा`सोबत विद्यार्थ्यांनी कार्यक्रमानंतर सेल्फीसाठी चांगलीच गर्दी केली.

पुरंदर शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात विद्यार्थी प्रतिसादात व समोरील व्यासपीठावर वार्षिक पारितोषिक वितरणाचा यावेळी कार्यक्रम झाला. समारंभामध्ये वर्षभरात झालेल्या वक्तृत्व, निबंध, क्रीडा, चित्रकला, नाट्य स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, शिष्यवृत्ती परीक्षा, एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षा आदींमध्ये प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा `देव माणूस` फेम किरण गायकवाड यांचे हस्ते पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्याचे स्वागत पुरंदर संकुलाचे प्राचार्य इस्माईल सय्यद यांनी केले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत सोमेश्वर सहकारी साखर कारखाना माजी संचालक अरुणआप्पा, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसचिव तथा प्राचार्य सीताराम गवळी, विद्या समिती सचिव अरुण सुळगेकर, व्यवस्थापक मंडळ सदस्य गुलाबराव बोराटे, दिलीप गिरमे, सुधाभाऊ गिरमे, बाळासाहेब भिंताडे, बंडूकाका जगताप, साकेत जगताप, संतोष जगताप, अभिजित जगताप, संदीप इनामके, संजय चौखंडे, इब्राहिम सय्यद, प्रा. केशव काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.


स्वागत प्राचार्य इस्माईल सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन गजानन गोरवे यांनी तर आभार प्रा. राजेश राणे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. राजेंद्र निचळ, अजय काळभोर, रमाकांत निकम, नीलेश जगताप, विजय खोमणे, राजेंद्र बडे, नम्रता गोंडाळकर, सरोजा वाघ, शोभा कळवीकट्टे, अर्चना यादव, नंदादीप कदम यांनी केले.

03167