पथ विक्रेत्यांसाठी डिजिटल माध्यमांचे प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथ विक्रेत्यांसाठी डिजिटल माध्यमांचे प्रशिक्षण
पथ विक्रेत्यांसाठी डिजिटल माध्यमांचे प्रशिक्षण

पथ विक्रेत्यांसाठी डिजिटल माध्यमांचे प्रशिक्षण

sakal_logo
By

सासवड, ता. १३ : सासवड नगरपरिषदेतर्फे पथ विक्रेत्यांसाठी पंतप्रधान स्वनिधी योजना अंतर्गत `मैं भी डिजीटल` शिबिर आणि परिचय बोर्ड वितरण कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता. त्यात आर्थिक व्यवहारासाठी फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा विविध डिजिटल माध्यमांचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण दिले.

सासवड नगरपरीषदे अंतर्गत डि.एन.यु.एल.एम. विभागामार्फत नुकतेच पथ विक्रेत्यांना परिचय बोर्डाचे वाटप झाले. मेळाव्यास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील मोरे, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्रीमती देविका, प्रकल्प अधिकारी जस्मिन मधाळे आदी व पथ विक्रेते उपस्थित होते. फेरीवाल्यांना आर्थिक व्यवहारासाठी विविध डिजिटल माध्यमांचाजास्तीत जास्त सुरक्षित वापर करण्याबाबत प्रशिक्षण दिले. कर्जाची वेळेत परतफेड करणे, बँकामधून जीवन ज्योती विमा, जीवन सुरक्षा विमा, अटल पेंशन योजना आदी योजनांचा जास्तीत लाभ कसा घ्यावी, याची माहिती दिली. तसेच परिचय बोर्डचा वापर कसा करावा, याची माहिती दिली.

कोरोना महामारीच्या काळात सदरीलपंतप्रधान स्वनिधी योजना सुरू झाल्यानंतर पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सासवड शहरातील अधिकाधिक फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले होते. दरम्यान, सध्या जवळपास ३६० फेरीवाल्यांनी पंतप्रधान स्वनिधी योजना अंतर्गत १० हजार, २० हजार, ५० हजार रुपये असे कर्ज घेतले आहे. तसेच सासवड शहरातील अजून उर्वरीत फेरीवाल्यांनी पंतप्रधान स्वनिधी योजना अंतर्गत व डि.एन.यु.एल.एम. विभागाच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन यानिमित्ताने मुख्याधिकारी मोरे यांनी यानिमित्ताने केले. प्रकल्प अधिकारी जस्मिन मधाळे यांनी आभार मानले.
03277