माहूर माध्यमिक विद्यालयास १५ संगणक भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहूर माध्यमिक विद्यालयास १५ संगणक भेट
माहूर माध्यमिक विद्यालयास १५ संगणक भेट

माहूर माध्यमिक विद्यालयास १५ संगणक भेट

sakal_logo
By

सासवड, ता. १७ : सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या माहूर (ता. पुरंदर) येथील माहूर माध्यमिक विद्यालयास नुकतेच मुंबई येथील युनायटेड वे मुंबई या संस्थेच्या वतीने ‘अभ्युदय योजनेतून’ ६ लाख ३९ हजार रुपये किमतीचे १५ संगणक संच भेट देण्यात आले. युनायटेड वे मुंबई या संस्थेच्या वतीने अभ्युदय योजनेतून संस्थेचे प्रतिनिधी लक्ष्मण ढोबळे, संभाजी फुंदे, किरण इंगळे, जयवंत रणपिसे, स्वप्नील खंडारे यांच्या माध्यमातून माहूर माध्यमिक विद्यालयाच्या संगणक कक्षासाठी १५ संगणक देण्यात आले आहेत. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा कोंडे यांनी युनायटेड वे मुंबई संस्थेच्या प्रतिनिधींचे विद्यालयाच्या वतीने आभार मानले. याप्रसंगी महेंद्र भोसले, विकास राऊत, इंद्रभान पठारे, रामचंद्र जगताप, रामप्रभू पेटकर, मालिनी माहूरकर, लता गायकवाड, छाया माहूरकर, मंगल जगताप, श्रीकांत खोमणे, राम कुंभार उपस्थित होते.