
सासवडमध्ये बचत गटाच्या प्रक्रिया उद्योगाचा प्रारंभ
सासवड,ता.२५ : सासवड नगरपरिषदेतर्फे (ता. पुरंदर) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेअंतर्गत दोन महिला बचत गटांना ८ लाखांचे कर्ज वाटप केले होते. त्यापैकी प्रतिभा महिला बचत गटाने मसाला व प्रक्रीया उद्योग सुरू केला. त्याचा प्रारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
दारिद्र्य रेषेखालील महिलांना व्यवसायासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देण्यात यते. घटकासाठी ९ बचतगटांनी अर्ज होते. त्यापैकी ६ बचतगटाचे अर्ज मंजूर झाले आणि दोन गटांना कर्ज वाटप करण्यात आले. नगरपरिषदेतर्फे विविध प्रशिक्षणे, मार्गदर्शन शिबिरे आणि अल्प व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
नगरपरिषदअंतर्गत डे.एन.यु.एल.एम. विभागामार्फत सुमारे १०० बचतगट सुरू आहेत. शहरातील प्रतिभा महिला बचतगटास या योजनेतून नगरपरीषदेमार्फतही सुमारे ४ लाख रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली होती. त्यामधून नीलम खळदे व सहकारी महिलांनी पुढाकार घेवून मसाला कांडप यंत्र आणि लिंबू क्रश यंत्र आणले. या यंत्रांचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील मोरे, जनमत विकास आघाडी माजी गटनेत्या आनंदीकाकी जगताप, माजी नगरसेविका पुष्पा जगताप, नंदुबापू जगताप आदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच या नव्या उद्योगाचा प्रारंभ करण्यात आला.
दरम्यान, सहायक प्रकल्प अधिकारी जस्मिन मधाळे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेबाबत उपस्थितीत महिलांना माहिती दिली. कार्यालय अधीक्षक संदेश मांगडे, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय गायकवाड, आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, वरिष्ठ लिपिक संजय पवार, शहर समन्वयक राम कारंडे, प्रमोद भोंडे, दिनकर टिळेकर, तुकाराम जगताप, अजिंक्य चौरे, अमित बहिरट, मनोज जगताप, संजय उर्फ मंत्री जगताप, ज्ञानेश्वर कामठे आदी मान्यवर व नागरिक, महिला उपस्थित होत्या.
............
03340