
नर्मदा स्नानाने कावड यात्रेची सांगता
सासवड, ता.२६ : पुरंदर - हवेलीतील मानाच्या शंभू महादेवाच्या १० कावडींची यावर्षी बारा ज्योतिर्लिंगांपैकी श्रीक्षेत्र परळीचे वैजनाथ महादेव, श्रीक्षेत्र औंढ्या नागनाथ महादेव, श्रीक्षेत्र उज्जैनचे महाकालेश्वर महादेव आणि श्रीक्षेत्र ओंकारेश्वर महादेव अशी कावड यात्रेची काल उशिरा सांगता झाली. नर्मदा नदीतील स्नान आणि ओंकारेश्वर महादेवाच्या दर्शनाने यंदाच्या कावड यात्रेची आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात आणि भक्तीरंगात व लोकरंगात सांगता झाली.
यावेळी सांगतेच्या वेळी तेथील श्री दत्तधाम मंदिराचे दर्शन घेण्यात आले. यावेळी महेश्वरचे आमदार मेडा यांनी पुरंदरचे आमदार जगताप यांचे यात्रा उपक्रमाबद्दल कौतुक केले. यावेळी नर्मदा नदीवर आमदार सर्वश्री मेडा आणि जगताप यांच्या हस्ते कावडींना विधीवत स्नान घालून महापूजा करण्यात आली. तसेच दत्त धाम मंदिरास प्रदक्षिणा घालून आरती करण्यात आली. यावेळी पुरंदर हवेलीच्या शंभूभक्तांनी जयघोष केला. श्रीक्षेत्र ओंकारेश्वर महादेवाचे दर्शनाच्या वेळी पुरंदर व हवेली तालुक्यातील १० गावांतील शंभू महादेवाच्या मानाच्या कावडी, मानकरी आणि सुमारे चार हजार शिवभक्तांचा यावेळी सहभाग होता.
याप्रसंगी यात्रेचे आयोजक आमदार जगताप यांच्यासह महेश्वरचे आमदार पाचीलाल मेढा, श्रीक्षेत्र नारायणपूर मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर, पुरंदरमधील नारायणपूर देवस्थानची संबंधीत दत्तधाम मंदिराचे दादा पायगुडे, यशवंतकाका जगताप, अजित जगताप,कमल किशोर पाटीदार, महादेव पाटील, दिनेश चौहान, प्रकाश कटारे तसेच शिवभक्त उपस्थित होते.
याप्रसंगी संत भूतोजीबुवा तेली कावडीचे महाराज कैलास बुवा कावडे, खळदचे नाना महाराज खळदकर, सासवडचे गाव पाटील संग्राम जगताप, संजय द. जगताप, नगरसेवक प्रवीण भोंडे, आमदार संजय जगताप मित्र परिवाराचे रवींद्रपंत जगताप, संदीप जगताप, सागर घाटगे, रवी जगताप, संभाजी महामुनी, सचिन कुंजीर आदींसह सहभागी दहा गावांतील हजारो शंभूभक्त उत्साही रंगात रंगले.
पुरंदर हवेलीतील शंभूभक्त व कावडींचे आतापर्यंत दहा ज्योतिर्लिंग यात्रा दर्शन पूर्ण झाले आहे. स्वर्गीय. चंदू काका जगताप यांचे बारा ज्योतिर्लिंग पूर्ण करण्याचे स्वप्न होते. ते आता पूर्ण होत असून पुढील दोन ज्योतिर्लिंग बद्रीनाथ आणि नेपाळ मधील पशुपतिनाथ दर्शन यात्रा लवकरच आयोजित करण्यात येईल.
- संजय जगताप, आमदार
03347