
गुरोळीच्या उपसरपंचपदी संदीप खेडेकर
सासवड, ता. १३ : गुरोळीच्या (ता.पुरंदर) उपसरपंचपदी संदीप खेडेकर यांची एकमताने निवड झाली. ग्रामपंचायतच्या विशेष निवडणूक सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच मोहिनी म्हस्कू खेडेकर या होत्या. तसेच सहायक म्हणून ग्रामसेविका अनिता भोस यांनी काम पाहिले.
गावची सार्वत्रिक निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली होती. सत्ताधारी गटांतर्गत ठरल्याप्रमाणे मधुकर खेडेकर यांनी राजीनामा दिला. त्यामुळे उपसरपंचपदाची जागा रिक्त झाली होती. त्या जागेकरिता संदीप खेडेकर यांचाच अर्ज आल्याने त्याची निवड बिनविरोध करण्यात आली. खेडेकर हे राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांचे खासगी सचिव प्रशांत खेडेकर यांचे बंधू आहेत. पुरंदरचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे नूतन उपसरपंच खेडेकर हे समर्थक आहेत. यावेळी सरपंच मोहिनी खेडेकर यांच्या हस्ते नूतन उपसरपंच खेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास
गुरोळीचे माजी सरपंच हिरामण खेडेकर, माजी उपसरपंच मधुकर खेडेकर, सदस्य जीवन खेडेकर, रेणुका खेडेकर, सुरेश भोसले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी नूतन सरपंच खेडेकर म्हणाले., सरपंच मोहिनी खेडेकर आणि सर्व सदस्य आणि गावकऱ्यांना विश्वासात घेऊन विकास कामांना अधिक गती दिली जाईल.
03399