सामूहिक खरेदीतून मिळविले गुणवत्तापूर्ण बियाणे

सामूहिक खरेदीतून मिळविले गुणवत्तापूर्ण बियाणे

Published on

सासवड, ता.६ : काळदरी (ता.पुरंदर) हे पुरंदर तालुक्यातील भाताचे आगार म्हणून ओळखले आहे. येथे प्रत्येक शेतकरी भात पिकवितो. त्यामुळे बाजारातून स्वतंत्रपणे भात बियाणे खरेदी करणे टाळून सुमारे २२५ शेतकऱ्यांना सहा शेतकरी बचत गटाद्वारे अगदी गुणवत्तापूर्ण व प्रमाणित बियाणे खरेदी केले. त्यातून फक्त गटप्रमुख शेतकरी सहाजण आले व सासवडच्या शेती उद्योग भंडार येथून हे सहा टन बियाणे खरेदी केले. बियाणे एकत्रित खरेदी केल्याने त्यातून ३० हजार रुपयांची बचत झाली.

विशेष म्हणजे सभासद शेतकऱ्याला घरपोच बियाणे मिळाले. त्याचा वाहतूक किंवा प्रवास खर्च वाचला. वेळेची बचत होऊन गुणवत्तापूर्ण व प्रमाणित बियाणे स्वस्तात उपलब्ध झाले. स्वतंत्रपणे बियाणे खरेदीत फसवणूकही होते. ती यात टाळली गेली. प्रत्येकाने कृषी शास्त्रीय पद्धतीने बियाणे काढून बियाणे बॅग लॉट नंबरसह जपून ठेवली. यामध्ये भैरवनाथ शेतकरी बचत गट, करंजाई माता शेतकरी बचत गट, रासाईदेवी शेतकरी बचत गट, गोविंदबुवा शेतकरी बचत गट, काळभैरवनाथ शेतकरी बचत गट, श्री गोविंदबुवा शेतकरी बचत गट अशा सहा शेतकरी बचत गटांद्वारे २२५ शेतकरी सभासदांसाठी हे बियाणे खरेदी झाली. शेतकरी बचत गटाचे प्रमुख व माजी सरपंच अंकुश परखंडे, नरहर देव, भगवान पिसाळ, काशिनाथ शेलार, अंकुश थोपटे, गोरख मोरे, आबासाहेब धनावडे आदींनी आज सकाळ शी बोलताना सांगितले.

बियाणांची उगवण क्षमता उत्तम
तालुका कृषी कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, कृषी पर्यवेक्षक संदीप कदम, कृषी सहायक स्वप्नाली चौंडकर यांनी एकत्रित बियाणे खरेदी करून बचत केल्याबद्दल गटांचे कौतुक केले. शिवाय भात बियाणांची उगवण क्षमतेचे चाचणी कशी घ्यायची याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यात चौथ्या व पाचव्या दिवशी पाहणी केली असता ९५ ते ९६ टक्के बियाणांची उत्तम उगवण क्षमता आढळली. त्यातून प्रत्येक शेतकऱ्यास उगवण क्षमचेचे धडे मिळाल्याने स्वतः कृती करीत. मगच बिजप्रक्रीया करीत बियाणे रोपनिर्मितीसाठी रोपवाटिकेत टाकण्याचे काम केले.

शेतकऱ्यांनी फक्त बियाणे नव्हे तर कृषी निविष्ठा ज्यात खते, औषधे, जैविक खते, युरिया ब्रिकेट, शेती साहित्य आदींचीही एकत्रित खरेदी केली तर बचत होते. त्यातून उत्पादन खर्च कमी करता येतो. सामूहिक ताकत, शेतकरी बचत गटांची सांगड, सामूहिक व गटशेतीला आता महत्त्व आले आहे. काळदरीकरांनी हे दाखवून दिले. आता इतर भागातही याचे अनुकरण व्हावे.
- सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी, ता. पुरंदर

03800

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.