सासवड पालिका अभियंता रामानंद कळसकर झाले ‘डीवायएसपी’

सासवड पालिका अभियंता रामानंद कळसकर झाले ‘डीवायएसपी’

सासवड, ता. १० : ‘नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची धुरा अनेक वर्षे समर्थपणे सांभाळताना. त्याचे निरीक्षण व नियंत्रण याचा बारकाईने अभ्यास करून एक वेगळा अधिकारी म्हणून पाणी पुरवठा विभागाचे अभियंता कळसकर यांची ओळख आहे. बदली होऊनही किंवा कार्यकाल संपूनही नगरविकास विभागाने त्यांना कित्येकदा मुदतवाढ दिली, यातच त्यांच्या कामाची पावती आहे. पाणी व आरोग्य हा शहराचा चेहरा असतो, तो व्यवस्थित ठेवण्याचे काम अभियंता नात्याने कळसकर यांनी केले,’ असे प्रतिपादन पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केले.

सासवड नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता व स्वच्छता पर्यवेक्षक रामानंद कळसकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत मोटर परिवहन गट ''अ’ पदाच्या पोलिस उपअधीक्षकपदी (डीवायएसपी) निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व निरोप समारंभ पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेच्या आवारात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

विशेष म्हणजे शहरी भागातही कळसकर पोलिस उपायुक्त म्हणूनही या निवडीतून काम करू शकणार आहेत. कार्यक्रमप्रसंगी आमदार जगताप यांच्यासह नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप, अजित जगताप, सारिका हिवरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


मुख्याधिकारी निखिल मोरे, मार्तंड भोंडे, यशवंतकाका जगताप, सारिका हिवरकर, मोहन चव्हाण, मयूरी पाटोदकर, माऊली गिरमे, उत्तम सुतार, हनुमंत जाधव, अजिंक्य चवरे, हेमंत ताकवले आदींनी यावेळी मनोगते व्यक्त केली.

सत्कारास उत्तर देताना कळसकर म्हणाले की, पाणीपुरवठ्याचा विषय असल्याने रोज असंख्य फोन यायचे. लोकांच्या विविध अडचणी सोडविताना टीमवर्क चांगले करता आले. त्यामुळे निरोप घेताना व नव्या क्षेत्रात जाताना समाधान वाटते. सेवाकाळात सर्वांचे फार मोठे सहकार्य लाभले.
यावेळी अजित जगताप, रवींद्र जगताप, राजेश नलावडे, पायल पोमण, राम कारंडे, धोंडिराम भगनुरे, नीलिषा रासकर, सविता जगताप, सोपान जगताप, विनोद राठोड, भूषण मचाले आदींसह पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले.
---------------------
अभियंता रामानंद कळसकर यांच्या काळात गराडे, घोरवडी जलवाहिन्यांची दुरुस्ती झाली, वीर धरणावरील व कांबळवाडी संपवेलवरील वीजपंप बदलले गेले, कांबळवाडी संपवेलवर सौर ऊर्जा प्रकल्प मार्गी लागला, बंदीस्त गटर योजनेला चांगली गती आली, त्यामुळे कळसकर यांची पालिका यंत्रणेतील अनुपस्थिती जाणवेल. - संजय जगताप, आमदार
------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com