सासवडला रविवारी शाळांचा सन्मान सोहळा

सासवडला रविवारी शाळांचा सन्मान सोहळा

Published on

सासवड, ता. ११ : स्व. चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून आणि संत सोपानकाका फाउंडेशनच्या वतीने ५ जिल्हे आणि ५७ तालुक्यांत राबविलेल्या ‘संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा’ या उपक्रमाचा बक्षिस वितरण सोहळा रविवारी (ता. १६) सकाळी १० वाजता सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आणि आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
पुणे विभागातील ५ जिल्ह्यातील ५७ तालुक्यांतील सुमारे ३ हजार माध्यमिक विद्यालयांची पाहणी करून आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण, गुणवत्ता, भौतिक सुविधा आदी बाबींची पूर्तता केलेल्या शाळांना सन्मानित केले जाणार असल्याची माहिती अभियानाच्या संयोजन समितीच्या वतीने प्राचार्य नंदकुमार सागर यांनी दिली.
स्व. चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त ११ जून रोजी हा कार्यक्रम होणार होता, मात्र काही कारणामुळे हा सोहळा १६ जुलै रोजी होत आहे. याबाबत या अभियानाचे प्रमुख आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आणि या अभियानाच्या संयोजकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यामध्ये ही माहिती देण्यात आली. यावेळी संत सोपानकाका फाउंडेशनचे प्रकाश पवार, पुरंदर पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे रविंद्रपंत जगताप, विश्वजीत आनंदे, सतीश शिंदे, नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे, सुधाकर जगदाळे, इस्माईल सय्यद आदी उपस्थित होते.
बक्षिस वितरण कार्यक्रमास पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक, छत्रपती संभाजी महाराज नगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे, शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, मुंबई सेकंडरी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवकृपा पतपेढीचे अविनाश भोसले, ‘शिवकृपा’चे संचालक सुरेश संकपाळ उपस्थिती राहणार आहेत.

एकूण १८८ शाळांचा गौरव
अभियानात उपक्रमशील शाळा पुरस्काराने पुणे विभागातून ५ शाळांचा विशेष सन्मान होणार आहे. तसेच जिल्हास्तरावर प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले असून अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, शाॅल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर, तालुकास्तरावर प्रत्येक तालुक्यात प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले असून अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये रोख सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, शाॅल आणि श्रीफळ असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाप्रसंगी पुरंदर आणि हवेली तालुक्यातील तालुकास्तरावरील विजेत्या शाळांचाही सन्मान करण्यात येणार आहे. या अभियानात एकूण ३ हजार शाळांनी सहभाग घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.