`सुंदर माझी शाळा` उपक्रम कौतुकास्पद

`सुंदर माझी शाळा` उपक्रम कौतुकास्पद

सासवड, ता. १८ : ''विद्यार्थ्यांमुळेच शिक्षक आणि शाळा, पगार टिकून आहे. त्यामुळे शाळांची ज्ञानमंदिरे व्हावीत या हेतूने आमदार संजय जगताप यांनी हाती घेतलेला `सुंदर माझी शाळा` हा उपक्रम महाराष्ट्रातील एकमेव आमदार आणि एकमेव संस्थेने केला हे कौतुकास्पदच आहे. अशा उपक्रमांतून विद्यालयात भौतिक सुविधांसह गुणवत्ता टिकवणे आणि शिक्षकांनी ज्ञानदानाचे हे काम पुढे न्यावे,'' असे प्रतिपादन छत्रपती संभाजी महाराजनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले.

सासवड (ता.पुरंदर) येथे नुकताच संत सोपानकाका सहकारी बँक व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थांच्या वतीने स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर-हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या संकल्पेनतून आणि संत सोपानकाका फाउंडेशनच्या वतीने पाच जिल्हे आणि ५७ तालुक्यांतील सुमारे तीन हजार शाळांमध्ये `संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा` हा उपक्रम राबविण्यात आला. सासवड येथील अत्रे भवनात पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, छत्रपती संभाजी महाराज नगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, मुंबई सेकंडरी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बक्षीसवितरण पार पडले.

यावेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, संत सोपानकाका सहकारी बँकेच्या संचालिका व ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, सेकंडरी पतसंस्थेचे संचालक सतीश शिंदे, शिवकृपा पतपेढीचे माजी अध्यक्ष अविनाश भोसले, सुरेश संकपाळ, सुदाम इंगळे, प्रा. डॉ. एम. एस. जाधव, विजय कोलते, मार्तंड भोंडे, सुनीता कोलते, कृष्णा शेट्टी, डॉ. विनायक खाडे, प्रकाश पवार, रमणिकलाल कोठडिया, अॅड. युवराज वारघडे, माणिक झेंडे, तानाजी जगताप, शिवाजी कामथे, विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक उपस्थित होते.

जिल्हा स्तरावर प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक काढले असून, अनुक्रमे १० हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये रोख सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, शॉल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यात प्रथम तीन क्रमांक काढले असून, अनुक्रमे दोन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपये रोख सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, शॉल आणि श्रीफळ असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.

संयोजन समितीचे मुख्य समन्वय प्राचार्य नंदकुमार सागर, मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे, वसंत ताकवले, कुंडलिक मेमाणे, अनिल उरवणे, रवींद्रपंत जगताप, संत सोपानकाका बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप साबणे, विश्वजित आनंदे, सतीश शिंदे आदींसह सदस्यांनी नियोजन केले. प्राचार्य नंदकुमार सागर यांनी प्रास्ताविक तर महेश राऊत यांनी सूत्रसंचालन केले.


पाच लाख रुपयांची रोख बक्षीस
जिल्हा पातळीवर प्रत्येकी चार क्रमांकाच्या एकूण २० शाळांना आणि तालुकापातळीवर तीन क्रमांकापर्यंत १७१ शाळा बक्षिसपात्र ठरल्या. या बक्षिसपात्र शाळांना सुमारे पाच लाख रुपयांची रोख बक्षीस देण्यात आले. जिल्हास्तरीय विजेत्या शाळांना अनुक्रमे १० हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये रोख तर तालुकास्तरावर प्रथम तीन क्रमांक काढले असून अनुक्रमे तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपये रोख सन्मानचिन्ह देण्यात आले.


03839

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com