शेतकऱ्यांना मिळाली हक्काची बाजारपेठ

शेतकऱ्यांना मिळाली हक्काची बाजारपेठ
Published on

सासवड, ता. २६ : दिवे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘लोकनेते दादासाहेब जाधवराव फळे बाजार’
मंगळवारी (ता. २६) सुरू करण्यात केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ मिळाली आहे.
या बाजारात शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बाजाराचे संकल्पक भाजपचे पुरंदर हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते प्रारंभ झाला आणि पहिल्याच दिवशी याला शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

बाजाराच्या उद्‌घाटनप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या संगीता काळे, सरपंच रूपेश राऊत, माजी सरपंच गुलाबराव झेंडे, अमित झेंडे, बापू टिळेकर, उत्तम झेंडे, गणपत शितकल, बाळासाहेब झेंडे, राजेंद्र काळे, दिलीप झेंडे, बापू जगताप, अमर झेंडे, शरद झेंडे, सुजाता जगदाळे, श्रद्धा काळे, पुनम झेंडे, सुरेश झेंडे, पोपट झेंडे, समीर झेंडे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

​पहिल्याच दिवशी मिळाला चांगला बाजारभाव
नवीन फळ बाजाराला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. सीताफळ, डाळिंब, पेरू आणि अंजीर यांसारख्या फळांची मोठी आवक झाली. एकूण ५५० क्रेट सीताफळ, २०० क्रेट डाळिंब, १५० क्रेट पेरू आणि ७० टब अंजीर बाजारात दाखल झाले. व्यापारी युवराज जाधवराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या फळांना चांगला बाजारभाव मिळाला. सीताफळाला प्रतिक्रेट ५०० ते ४५०० रुपये, डाळिंबाला ३००० ते ४००० रुपये, पेरुला १२०० ते १५०० रुपये आणि अंजिराला प्रति टब ६०० ते ७०० रुपये बाजारभाव मिळाला.

एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध
​दिवे बाजारात सुमारे ४५ ते ५० स्थानिक आणि बाहेरील व्यापारी उपस्थित होते. व्यापाऱ्यांना ग्रामपंचायतीने सुमारे ५००० चौरस फूट जागेतील इमारत उपलब्ध करून दिली आहे. तसेच स्वच्छतागृहांची दुरुस्तीही लवकरच करण्यात येणार असल्याचे माजी सरपंच गुलाबराव झेंडे यांनी सांगितले. यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.

05492

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com