पर्यावरणपूरक बैल जोड्यांना सासवडच्या बाजारात मागणी

पर्यावरणपूरक बैल जोड्यांना सासवडच्या बाजारात मागणी

Published on

सासवड, ता. २० : बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर सासवडमध्ये तयारीला वेग आला आहे. बाजारात आकर्षक आणि पर्यावरपूरक इको-फ्रेंडली मातीच्या बैलांच्या जोड्या दाखल झाल्या आहेत. शहराच्या कुंभारवाड्यात तयार झालेल्या या मूर्तींना स्थानिक ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. कुंभार व्यावसायिकांसोबतच अन्य काही व्यावसायिकही या व्यवसायात उतरले आहेत.
​मातीच्या मूर्तींचे बाजारात त्यांच्या आकारानुसार ठरवण्यात आले आहेत. लहान आकाराच्या सहा इंच ते मोठ्या एक फूट उंचीच्या मूर्तींच्या जोड्या १०० ते ७५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
मत्स्यविक्री करणारे व्यावसायिक विकास केची हे या हंगामात दरवर्षी मातीच्या बैलजोड्यांचे आणि घटस्थापनेचे दुकान लावतात. यातून त्यांना पोळा आणि नवरात्र हंगामात सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचा व्यवसाय होतो. त्यांनी सांगितले की, यंदा माती आणि इतर साहित्याचे दर वाढल्याने मूर्तींच्या किमतीत थोडी वाढ झाली आहे, तसेच उत्पादनही थोडे कमी झाले आहे. तरीही, त्यांच्या दुकानातील सर्व मूर्ती पर्यावरणपूरक आहेत.

.
05642

Marathi News Esakal
www.esakal.com