सीताफळाच्या भावात सासवड येथे घसरण
सासवड, ता. २४ : सासवड (ता.पुरंदर) येथील सीताफळाच्या घाऊक बाजारात आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने बाजारभावात घसरण झाली आहे. तर पेरू आणि डाळींबाच्या दरात वाढ झाली आहे.
सासवड येथील घाऊक फळ बाजारात दोन आठवड्यांपूर्वी दररोज सुमारे ५०० ते ६०० क्रेट सीताफळाची आवक होत आहे. ती आता १२०० ते १५०० क्रेट पर्यंत गेली आहे. याशिवाय डाळिंबाचे १५० क्रेट, अंजीराचे २५ ते ३० टब, तर गुलाबी पेरूच्या १२० ते १५० बॅगा, गावरान पेरू व ललीत आणि बाटली पेरूचेही जवळपास ८० ते ९० क्रेट बाजारात येत आहेत. स्थानिक व परप्रांतीय लहान - मोठे २०० ते २५० व्यापारी येथून फळे खरेदी करीत असल्याचे व्यापारी हरून बागवान व समिर बागवान यांनी सांगितले.
पावसामुळे बाजाराच्या परीसरात मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून य वरून क्रेट घेऊन पायी आणि दुचाकीवरून जाताना शेतकरी घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत.
बाजारभाव रुपयांत (प्रतिक्रेट) : चांगल्या दर्जाचे: ८०० ते १५००, डाळिंब: (लहान फळ) : १८०० ते २०००, डाळिंब : (१५० ग्रॅम पुढील फळ) : २८०० ते ३२००, अंजीर: ५०० ते ६००, गुलाबी पेरू (१६ किलो बॅग): ५०० ते ६००, गावरान पेरू : १२०० ते १५००, बाटली गुलाबी पेरू: १००० ते १२००.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.