सासवडमध्ये कमालीची उत्सुकता

सासवडमध्ये कमालीची उत्सुकता

Published on

सासवड, ता. ४ : सासवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी संपून आता सर्वांचे लक्ष निर्णायक क्षणाकडे लागले आहे. नगराध्यक्षपदासह ११ प्रभागांमधील २० नगरसेवकपदांसाठी मंगळवारी (ता. २) अत्यंत उत्साहात (६७.०२ टक्के) मतदान झाले. या निवडणुकीचा अंतिम आणि बहुप्रतिक्षित निकाल रविवारी (ता. २१) लागणार आहे.
नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उभे असलेल्या ४५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात चोख पोलिस बंदोबस्तात बंद आहे.​ सर्वाधिक मतदार असलेला प्रभाग ५ (३९६४ मतदार) असून, तेथेच सर्वाधिक ७४.७५ टक्के मतदान झाले.​ सर्वात कमी मतदान प्रभाग ८ मध्ये (५९.७० टक्के) नोंदवले गेले.​ प्रभाग ४ मधील ताथेवाडी बूथमध्ये ८०.८३ टक्के इतके मतदान झाले.रविवारी (ता. २१) सकाळी १० वाजल्यापासून सासवड नगरपरिषदेच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.​ निवडणूक निर्णय अधिकारी सतीश थेटे आणि साहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी मतमोजणीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे.​ मतमोजणी ११ प्रभागांसाठी ११ टेबलांवर होणार असून, ही प्रक्रिया एकूण चार फेऱ्यांमध्ये पार पडेल.


मतदार***एकूण आकडेवारी***हक्क बजावणारे
पुरुष***१६,८१८***११४०४
महिला**१६,८३८***१११५३
एकूण***३३,६५६***२२,५५७

चौकाचौकांत एक्झिट पोलचे अंदाज
​या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्य लढत झाली आहे. दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते विजयाचे दावे करत असल्याने निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही प्रभागांत अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या असल्याच्या चर्चा शहरात सुरू असून, त्यामुळे अशा उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. चौकाचौकांत ‘एक्झिट पोल''’चे अंदाज लावले जात असून हे अंदाज दररोज बदलतानाही दिसत आहेत.

प्रभाग क्र. ११‘अ’साठी...
प्रभाग क्र. ४ ‘ब’ची जागा यापूर्वीच बिनविरोध झाली आहे.​ न्यायप्रविष्ट असलेल्या प्रभाग क्र. ११ ‘अ’ साठी नव्याने अर्ज दाखल करून घेतले जाणार नाहीत, तसेच १० डिसेंबर पर्यंत अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून २० डिसेंबरला मतदान होऊन २१ डिसेंबरला निकाल लागणार आहे. सासवड नगरपरिषदेवर कोणाची सत्ता येणार? या प्रश्नाचे उत्तर आता २१ डिसेंबरला स्पष्ट होईल आणि सासवडच्या राजकीय भविष्याची दिशा देखील निश्चित होईल.

प्रभाग***एकूण मतदार*** झालेले मतदान***टक्केवारी
१ ***३०५७ ***२१९९***७१.९३
२***१९३७***१३७९***७१.१९
३***२३०५***१६९०***७३.३२
४***३६३४***२४२७***६६.७९
५***३९६४***२९६३***७४.७५
६***३४२५***२१४६***६२.६६
७***३७५६***२४९५*** ६६.४३
८***३०००***१७९१***५९.७०
९***२०५४***१२८५***६२.५९
१०***३०७४***१८९९***६१.७८
११***३४५१***२२८३***६६.१५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com