Mon, Jan 30, 2023

धानोरेतील उपसरपंचाने स्मशानभूमीत केला वाढदिवस साजरा
धानोरेतील उपसरपंचाने स्मशानभूमीत केला वाढदिवस साजरा
Published on : 7 January 2023, 11:49 am
तळेगाव ढमढेरे, ता. ७ : धानोरे (ता. शिरूर) येथील उपसरपंच शांतिलाल भोसुरे यांनी आपला वाढदिवस ग्रामस्थांच्या समवेत गावच्या स्मशानभूमीच्या शेडमध्ये साजरा केला. वाढदिवसानिमित्त स्मशानभूमीच्या शेडमधील कट्ट्यावर त्यांनी केक कापला. नूतन वर्षाचे औचित्य साधून ‘नवी संकल्पना नवी दिशा’ या हेतूने येथील स्मशानभूमी परिसरात उपसरपंच भोसुरे यांनी विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण केले. गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी उपसरपंच त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.