
धानोरे येथे अपघातात पत्नी ठार, पत्नी जखमी
तळेगाव ढमढेरे, ता. १० : धानोरे (ता. शिरूर) येथील पांढरे वस्ती येथे रस्त्यावर झालेल्या विचित्र अपघातात पत्नी ठार, तर पती गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली.
पांढरे वस्ती येथे तळेगाव ढमढेरे-पिंपरी सांडस रस्त्यावर मारुती सुझुकी (क्र. एमएच १२ ईएम ३०३१) या भरधाव मोटारीने विरुद्ध बाजूला येऊन दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या जयश्री शिवाजी गरुड (वय ५०, रा. धानोरे) यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, दुचाकीवरील शिवाजी तुकाराम गरुड (वय ५५) यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. जखमीवर शिक्रापूर येथील खासगी दवाखान्यात उपचार चालू आहेत. अपघातातील कारचा पुढील भाग चक्काचूर झाला असून, दुचाकी पूर्ण मोडली. या अपघाताची फिर्याद राजेअमरसिंह ढमढेरे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यामध्ये दिली.