
ोरोहित पवारांचा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने सत्कार
तळेगाव ढमढेरे, ता.१८ : पुणे येथे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर थेऊरकर व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांच्या आकर्षक सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याला आमदार रोहित पवार यांच्यासारखे दूरदृष्टीचे व उमदे नेतृत्व मिळाले आहे. त्याचा भविष्यात निश्चित फायदा उदयोन्मुख क्रिकेट तरुणांना होणार आहे. सर्वसामान्य ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना राज्य आणि देशपातळीवर क्रिकेटच्या माध्यमातून संधी मिळेल आणि रोहीत दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि देशातील क्रिकेट एका उंचीवर जाईल अशी अपेक्षा श्री थेऊरकर व दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर गव्हाणे, सणसवाडीचे युवा नेते नीलेश दरेकर, प्रा.अनिल गोटे आदी उपस्थित होते.
04258