निमगाव म्हाळुंगी येथील शाळेस पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निमगाव म्हाळुंगी येथील शाळेस पुरस्कार
निमगाव म्हाळुंगी येथील शाळेस पुरस्कार

निमगाव म्हाळुंगी येथील शाळेस पुरस्कार

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. २५ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला ‘पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या हस्ते आज (ता. २६) प्रजासत्ताक दिनानिमित्त, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग पुणे (वानवडी) येथील कार्यालयात पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत पलांडे व प्राचार्य संजीव मांढरे यांनी दिली.
राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात २५० माध्यमिक शाळांमध्ये इको क्लब स्थापन केलेले आहेत. या वर्षात पर्यावरण विषयक उपक्रम कसे राबविले त्याबाबत शाळांची तपासणी करून प्रथम क्रमांकाच्या पाच शाळांना व एक उत्तेजनार्थ पंचतारांकित हरित शाळेला पुरस्कार जाहीर केला आहे. यामध्ये निमगाव म्हाळुंगीच्या विद्या विकास मंदिर विद्यालयाची जिल्हास्तरावर उत्तेजनार्थ पंचतारांकित हरित शाळा पुरस्कारासाठी निवड केली आहे.