शेतात काम करणाऱ्या महिलेला मारहाण करून दागिने पळवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतात काम करणाऱ्या महिलेला 
मारहाण करून दागिने पळवले
शेतात काम करणाऱ्या महिलेला मारहाण करून दागिने पळवले

शेतात काम करणाऱ्या महिलेला मारहाण करून दागिने पळवले

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. १० : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पीएमआरडीए बायपास रस्त्याच्या कडेला शेतात खुरपणी करणाऱ्या विवाहित महिलेला मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने चोरट्याने पळविले. याबाबत सुनीता नवनाथ माने (रा. तळेगाव ढमढेरे, लांडे वस्ती) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, तळेगाव ढमढेरे येथे पीएमआरडीए या बायपास रस्त्यालगत असलेल्या शेत जमिनीत दुपारच्या सुमारास खुरपणी करीत असताना अचानक २५ ते ३० वयोगटातील अनोळखी व्यक्ती पाठीमागे आला आणि त्याने महिलेच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून जबरदस्तीने अंगावरील सुमारे ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यात महिला डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर शिक्रापूर येथील खासगी दवाखान्यात उपचार चालू आहेत.