तळेगाव येथील केंद्रावर गुलाबपुष्प देऊन स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव येथील केंद्रावर
गुलाबपुष्प देऊन स्वागत
तळेगाव येथील केंद्रावर गुलाबपुष्प देऊन स्वागत

तळेगाव येथील केंद्रावर गुलाबपुष्प देऊन स्वागत

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. २१ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशालेतील परीक्षा केंद्रात आज बारावीची परीक्षा सुरळीत सुरू झाल्याची माहिती केंद्र संचालक सुवर्णा चव्हाण यांनी दिली.
येथील परीक्षा केंद्रावर एकूण ६२१ विद्यार्थी परीक्षेस बसले असून, यामध्ये तळेगाव ढमढेरे, निमगाव म्हाळुंगी, कासारी व करंदी येथील शाळांतील बारावीचे विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण, उपमुख्याध्यापक सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, उपकेंद्र प्रमुख गुरुनाथ पाटील, प्रा. कुंडलिक कदम, प्रा. रत्नप्रभा देशमुख, मुख्याध्यापक अशोक सरोदे, प्रा. रत्नप्रभा देशमुख, दत्तात्रेय बनसोडे, विविध विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.
यावेळी केंद्र संचालकांतर्फे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. येथील केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांची सुनियोजित बैठक व्यवस्था करण्यात आली होती. तळेगाव ढमढेरे पोलिस दूरक्षेत्रातर्फे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व संचालकांनी सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या.