ढमढेरे महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानांतर्गत मुलींना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढमढेरे महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानांतर्गत मुलींना मार्गदर्शन
ढमढेरे महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानांतर्गत मुलींना मार्गदर्शन

ढमढेरे महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानांतर्गत मुलींना मार्गदर्शन

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. ४ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भयकन्या अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आरोग्य विषयक, महिला संरक्षक कायदे व स्वसंरक्षण याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ॲड. सोनाली वडघुले यांनी भारतीय संविधानामध्ये असलेले महिलांसाठीचे कायदे व त्याबाबत राज्यघटनेच्या कलमांची माहिती सांगितली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहाय्यक कुसुम निघूट यांनी विवाहपूर्व समुपदेशन व आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.
क्रीडा प्रशिक्षक प्रकाश घोलप यांनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. यामध्ये मुली व महिलांना होणारी छेडछाड आणि समाजकंटकांकडून होणारा त्रास याचा प्रतिकार करण्याकरिता आवश्यक असे स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन, मुलींनी शारीरिकदृष्ट्या सक्षम बनण्याची गरज असल्याचे सांगून उत्तम आहार व व्यायामाची गरज असल्याचे सांगितले. महिला प्राध्यापकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन केले. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंद ढमढेरे, संचालक महेशबापू ढमढेरे यांनी अभियानाचे कौतुक केले. प्रा. पराग चौधरी यांनी स्वागत केले. प्रास्ताविक प्रा. विवेक खाबडे यांनी, सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रेय कारंडे यांनी तर आभार प्रा. अमेय काळे यांनी मानले.