
कोंढापुरी सोसायटीच्या अध्यक्षपदी स्वप्नील गायकवाड
तळेगाव ढमढेरे, ता. २३ : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी स्वप्नील अरुणराव गायकवाड आणि उपाध्यक्षपदी दीपक सुनील गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.
कोंढापुरी विविध कार्यकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून, नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. बी. पिसाळ आणि सहायक सचिव म्हणून दिलीप पुणेकर यांनी कामकाज पाहिले.
यावेळी अविनाश अर्जुन गायकवाड, प्रदीप बबन गायकवाड, महेंद्र श्यामराव घाडगे, अमोल फक्कड गायकवाड, बाळासाहेब बापूराव गायकवाड, नामदेव मल्हारी गायकवाड, अशोक दादाभाऊ गायकवाड, मंगल शांताराम गायकवाड, सुमन बबन शेडगे, रामदास सुदाम भुजबळ, धाकू लक्ष्मण मरगळे हे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
आगामी काळात सहकारी संस्थेचा कारभार आमदार ॲड. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने करणार असल्याचे अध्यक्ष स्वप्नील गायकवाड व उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी यावेळी सांगितले.