तळेगावातील दिव्यांगाच्या घराचे स्वप्न साकार

तळेगावातील दिव्यांगाच्या घराचे स्वप्न साकार

Published on

तळेगाव ढमढेरे, ता.२६ : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील माजी सरपंच स्वप्नील गायकवाड यांच्या पुढाकाराने तळेगाव ढमढेरे येथील दिव्यांगांच्या चांगल्या घराचे स्वप्न साकार झाले. या घराच्या चाव्या नुकत्याच मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या. विधायक उपक्रमाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार ॲड.अशोक पवार यांच्यासह तालुक्यात कौतुक होत आहे.
तळेगाव येथील दिवंगत हरिश्चंद्र जेधे व पत्नी मंदा जेधे त्यांच्या पाठीमागे तीन मोठी मुले आहेत. त्यापैकी एक गणेश जेधे (अंध), दुसरा महेश जेधे (मूकबधिर) व मुलगी राजश्री यादव (मूकबधिर) हे तिघे वडिलोपार्जित दहा बाय दहाच्या जीर्ण घरात राहत होती. त्यांचे मोडकळीस आलेले घर पाहून गायकवाड यांनी त्यांना नवीन घर बांधून देण्याचा निश्चय केला.
गायकवाड यांचा १९ एप्रिल २०२३ रोजी जन्माचा वाढदिवस असतो. "माझ्या वाढदिवसाला केक व इतर भेटवस्तू कोणीही आणू नये, एक हात मदतीचा, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली होती. यामुळे अनावश्यक खर्च टाळून माझ्या मित्र-मैत्रिणींनी व ग्रामस्थांनी तसेच हितचिंतकांनी घरासाठी लागणारी मदत साहित्य (उदा. सिमेंट, वीट इत्यादी) वस्तुरूपात किंवा रोख रकमेत द्यावे, अशी विनंती गायकवाड यांनी केली. त्यांच्या विनंतीमुळे विविध क्षेत्रातील मित्रमंडळींकडून भरघोस मदत झाली. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मित्रमंडळींनी जमा केलेल्या वस्तू व देणगी स्वरूपात दिलेली रोख रक्कम एकत्र केली. यामध्ये गायकवाड यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक असलेले वडील स्वर्गीय अरुणआबा गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्वतः वाढदिवसाचा खर्च टाळून जेधे यांच्या कुटुंबाला सुंदर घर बांधून दिले आहे.

स्वप्नील गायकवाड यांनी बांधून दिलेले घर नुकतेच जेधे कुटुंबाला अर्पण करण्यात आले आहे. यावेळी माजी सरपंच गायकवाड, जिल्हा दूध संघाचे संचालक ॲड. स्वप्नील ढमढेरे, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, ॲड. संपत ढमढेरे, बापूसाहेब ढमढेरे व ग्रामस्थ उपस्थित होते.


04978

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.