इतर योजनेच्या लाभार्थी महिलांनाही 
लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करा

इतर योजनेच्या लाभार्थी महिलांनाही लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करा

Published on

तळेगाव ढमढेरे, ता. ७ : शासनाच्या इतर विविध लाभार्थी महिलांनाही ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर तालुका अध्यक्ष विश्वास ढमढेरे यांनी आमदार ॲड. अशोक पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेचे स्वागतच आहे. परंतु अपंग, परित्यक्ता, विधवा, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार अनुदान योजना आदी शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या असंख्य महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत. या महिलांनाही शासनाने ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ या योजनेत प्राधान्याने समाविष्ट करून घ्यावे, पावसाळी अधिवेशनात इतर लाभार्थी महिलांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य विधिमंडळात लक्षवेधी मांडून महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी लेखी पत्राद्वारे ढमढेरे यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे केली आहे.
याविषयी आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता, विश्वास ढमढेरे यांनी दिलेल्या निवेदनासंदर्भात आपण राज्य विधिमंडळामध्ये लक्षवेधी सूचना मांडणार असून शासनाच्या इतर लाभार्थी महिलांनाही या योजनेत सामावून घेण्यासाठी आपण प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.