तळेगाव ढमढेरे येथे शिक्षक संस्थेचे अधिवेशन

तळेगाव ढमढेरे येथे शिक्षक संस्थेचे अधिवेशन

Published on

तळेगाव ढमढेरे, ता. १६ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शिरूर तालुका सेवानिवृत्त शिक्षक संस्थेचे त्रैवार्षिक अधिवेशन झाले. संस्थेचे अध्यक्ष भरत संकपाळ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी संकपाळ, संस्थेचे सचिव रा.ल. गायकवाड व संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून सेवानिवृत्त शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावल्यामुळे सर्वांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवणार आहे. केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर आंदोलन करण्याची तयारी असल्याचे महाराष्ट्र राज्य पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष एन.डी. मारणे यांनी सांगितले. यावेळी पुणे पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष वसंतराव वाबळे, सरचिटणीस एस.डी. पवार, भास्कर लोंढे, वासुदेव साठे, संपतराव तनपुरे, सुधाकर टक्के, शिक्षक पतसंस्थेचे सभापती रामचंद्र नवले, उपसभापती संदीप थोरात, माजी सभापती चंद्रकांत खैरे, युवराज थोरात, अंजली थोरात, मोहन थोरात आदी उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी संकपाळ, गायकवाड, सोपानराव धुमाळ, दादाभाऊ पुंडे, शिवाजीराव वाळके, लक्ष्मण जगताप, मारुती सुतार, सुखदेव नरके, रावसाहेब पवार यांनी परिश्रम घेतले.

TGD25B08074

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com