तळेगावातील इमारत कोसळण्याचा धोका

तळेगावातील इमारत कोसळण्याचा धोका

Published on

नागनाथ शिंगाडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव ढमढेरे, ता.१४ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जुनी झाली आहे. ती केव्हा कोसळेल याचा भरवसा नाही. जुन्या इमारतीला ऊर्जितावस्था कधी येईल? याकडे पशुपालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. येथील जुन्या इमारतीच्या शेजारी पशुवैद्यकीय डॉक्टरांना निवासासाठी सुसज्ज इमारत बांधलेली आहे, परंतु पाणीपुरवठा नसल्याच्या कारणावरून अनेक वर्षांपासून ती धुळखात पडली आहे.

जनावरांना विविध सुविधा पुरविल्या जातात. येथील दवाखान्यात डॉ. गोविंद राठोड हे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सहाय्यक वर्णोपचारक म्हणून राहुल गायकवाड हे काम पाहतात. परिचर व शिपाई हे पद रिक्त आहे. शिपाई नसल्यामुळे इमारतीत प्रचंड अस्वच्छता असून, धुळ, कचरा व गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

सध्याची स्थिती
- औद्योगिक व बागायती क्षेत्र असल्याने जनावरांची संख्या कमी
- रोगराईच्या प्रमाणात वाढ
- अल्प कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण

दृष्टिक्षेपातील सेवा
- जंत निर्मूलन व जनावरांचे लसीकरण
- पशुपालकांना ब्रीडिंगविषयक आतापर्यंत सात वेळा दूध संकलन केंद्रावर प्रशिक्षण
- दवाखान्यामार्फत पशुधन आरोग्य व रोग नियंत्रण
- जनावरांना गोठ्यावर व घरोघरी जाऊन शासकीय सेवा शुल्क आकारून सेवा
- दवाखान्यात औषधांचा गरजेपुरता व पुरेसा औषध साठा उपलब्ध
- लाळ्या खुरकूत या रोगावर ऋतूनुसार व गरजेनुसार उपचार
- शेळी व मेंढ्यांना गरजेनुसार पी.पी.आर.ची लस
- ११० शेतकऱ्यांनी कृत्रिम रेतन ऑनलाइन योजनेचा लाभ
- प्रशिक्षण जनजागृती व नवकल्पना अंतर्गत ४०० पशुपालकांना मार्गदर्शन
- वंध्यत्व निवारणासाठी दर शनिवारी शिबिर


एप्रिल ते आतापर्यंत
जनावरांचे कृत्रिम रेतन..... १६५
वंध्यत्व निर्मूलन मोहीम..... १० गावांत
जनावरांची गर्भ तपासणी.......३५५
बछड्यांचा जन्मदर.......४० टक्के
वंध्यत्वाचा दर.......१५ टक्के


लसीकरण
लंपी.....३०


मोबाईल ॲपद्वारे नोंद
५००० ....... लसीकरण
११० ....... कृत्रिम रेतन


चारा व वैरण विकास
- १० गावांतील जनावरांना पुरेल इतका चारा उपलब्ध
- कमी पडल्यास पशुपालक विकत घेतात.
- मका बियाणांचे ७० तर शुगर गेज (कडवळ) ५० शेतकऱ्यांना वाटप
- हिरवा चाऱ्याचा ६० टक्के तर सुका चाऱ्याचा ४० टक्के दर
- चारा बियाणांसाठी ५८ अर्जांची नोंद

पशुवैद्यकीय दवाखान्यात सरकारी योजना
- गोशाळा सहायता योजना
- शेळी - मेंढी विकास योजना
- दुग्ध व्यवसाय स्वयंरोजगार योजना


- पशुसंवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम
- राष्ट्रीय पशुधन मोहीम

कार्यक्षेत्रात जनावरांची संख्या
म्हैस.......... १६३३,
जर्सी गाय .......... ७२०५
शेळ्या.......... ३५२२
मेंढ्या .......... ६२१

पशुपालकांच्या समस्या
- औषधोपचारासाठी ज्यादा पैसे घेतात
- पावती दिली जात नाही
- डॉक्टर वेळेवर भेटत नाहीत
- औषधांचा पुरवठा कमी असतो
- बाहेरून औषधे आणावी लागतात

कोणत्याही प्रकारचे ज्यादा शुल्क घेतले जात नाही तसेच काही गंभीर आजार असतील तर बाहेरून औषधे आणावी लागतात. नोंदणीसाठी सेवाशुल्क १० रुपये, सर्जरीसाठी ७० रुपये, कृत्रिम रेतनसाठी ५० रुपये सेवाशुल्क आकारले जाते.
- डॉ. गोविंद राठोड, पशुवैद्यकीय अधिकारी

तळेगाव ढमढेरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सुमारे ८० लाख रुपये मंजूर करण्यात केले आहे. त्याचे टेंडरही झाले आहे. जिल्हा दूध संघातर्फे पशुपालकांना पशुखाद्य अल्प दरामध्ये वाटप केले जाते. पशुखाद्याचा प्रकल्प कोंढापुरी येथे आहे.
ॲड. स्वप्नील ढमढेरे, अध्यक्ष : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रज.


08343

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com