तळेगाव ढमढेरेच्या उपसरपंचपदी सचिन ढमढेरे
तळेगाव ढमढेरे, ता. १७ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन ढमढेरे यांची बिनविरोध निवड झाली. जबीन बागवान यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच रोहिणी तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. यावेळी ढमढेरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच तोडकर यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर ढमढेरे यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, ॲड. यशवंत ढमढेरे, माजी सरपंच पोपटभाऊ भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, अंकिता भुजबळ, दिपाली ढमढेरे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, संजय गांधी योजनेचे माजी अध्यक्ष संदीप ढमढेरे, बाळासाहेब लांडे, ॲड. सुरेश भुजबळ, नवनाथ भुजबळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

