निमगाव म्हाळुंगीत गाईचा मृत्यू
तळेगाव ढमढेरे, ता.१९ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) तरसखिळा परिसरातील नामदेव चौधरी यांच्या गोठ्यातील गाईवर बिबट्याने हल्ला करून गाईला ठार केले आहे. रात्री पहाटेच्या सुमारास बिबट्याने गाईवर हल्ला केला. गोठ्यात काहीतरी गडबड होत असल्याचे छाया चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा उघडून बाहेर पाहिले असता, बिबट्या गाईवर हल्ला करत होता. छाया चौधरी यांनी बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर शेजारील सर्जेराव गायकवाड यांना ही माहिती कळवली. परंतु तोपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात गाई ठार झाली होती. दरम्यान, सरपंच सचिन चव्हाण यांनी वनरक्षक प्रमोद पाटील यांना बिबट्याने गाईवर हल्ला केल्याची माहिती दिली. वनरक्षक पाटील यांनी मृत गाईचा पंचनामा केला. तसेच वनविभागातर्फे या ठिकाणी तातडीने पिंजरा लावण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात निमगाव म्हाळुंगी येथील दोन शेतकऱ्यांच्या सहा शेळ्यांवर हल्ला करून बिबट्याने आर्थिक नुकसान केले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी (ता. १९) पुन्हा बिबट्याने गाईवर हल्ला करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. निमगाव म्हाळुंगी परिसरात गेल्या दीड महिन्यापासून दररोज बिबट्याचे दर्शन होत असून, अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. बिबट्याच्या वास्तव्यामुळे ऊसतोडणी कामगार, महिला, शालेय विद्यार्थी व शेतकरी पुरते भयभीत झाले आहेत. बिबट्याचा बंदोबस्त तातडीने करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

