कोंढापुरीत चंपाषष्ठीनिमित्त पालखी सोहळा

कोंढापुरीत चंपाषष्ठीनिमित्त पालखी सोहळा

Published on

तळेगाव ढमढेरे, ता. २७ : कोंढापुरी (ता. शिरूर) येथे इतिहासकालीन जीर्णोद्धार केलेल्या खंडोबा मंदिरात आठवडाभर चंपाषष्ठी महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे हे १८ वे वर्षे आहे.
खंडोबा देवाचा अभिषेक, घटस्थापना, चरित्र पारायण, महाआरती, भजन, हरिपाठ, जागरण गोंधळ, भारुड, बानू-खंडोबा विवाह सोहळा आदी धार्मिक कार्यक्रम महोत्सवात झाले. वसंत हंकारे यांचे व्याख्यान, प्रकाश साठे यांचे हरिकीर्तन झाले. रामानंद उगले यांचे लोक गायन झाले. पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. तानाजी माळवदकर, रामदास गुंड यांचा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम झाला. संतोष पुजारी यांचे एकपात्री नाटक झाले. अमर ब्रॉसबँड हडपसर आणि साहिल नवगिरे यांचा संबळ ताशांचा कार्यक्रम तसेच युवराज गायकवाड यांचा हलगी कार्यक्रम झाला.
शिव मल्हार सेवा ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थांतर्फे कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, चंपाषष्ठीनिमित्त येथील मल्हार गडावर खंडोबा मंदिराच्या सभोवताली विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरातील गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. खंडोबा देवाला आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com