बांगलादेशाला टाकळी हाजी येथील डाळिंबांची गोडी

बांगलादेशाला टाकळी हाजी येथील डाळिंबांची गोडी

टाकळी हाजी, ता. २ : टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरात मोठ्या प्रमाणात डाळिंब बागा बहरल्या आहेत. उत्तम दर्जा असल्याने येथील डाळिंब देशातील बाजार पेठेत तर बाजारभाव खातातचं. परंतु या डाळिंबांने बागलादेशालाही भुरळ घातली आहे. यामुळे दररोज सुमारे ३० ते ३५ टन डाळिबांची निर्यात केली जात आहे. विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार असून, शेतकऱ्यांच्या हातात खुळखुळणार आहेत. डाळिंब उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टाकळी हाजी परिसरातील सुमारे पाचशे एकर क्षेत्रावर सध्या डाळिंबाच्या बागा बहरल्या आहेत. डाळिंबाला प्रतिकिलो १३० ते १८० रुपये मिळत आहेत. येथील युवा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पीक पद्धतीचा अवलंब करीत नेहमीच शेती उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्रावर डाळिंबांची रोपाची लागवड केलेली आहे. तीन वर्षापूर्वी तेल्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात डाळिंब बागा काढून टाकण्यात आल्या. मात्र येथील तरुणांनी पुन्हा नव्या जोमाने लावगड करीत परिसरात सुमारे दोन हजार एकर क्षेत्रावर डाळिंब बागा फुलविल्या आहेत.

बांगलादेशची व्यापारी तळ ठोकून
टाकळीमधील बागा पहाण्यासाठी बाहेरगावचे अनेक शेतकरी कृषी तज्ज्ञ भेट देत आहेत. सध्या येथे बांगलादेशचे व्यापारी तळ ठोकून आहेत. ते डाळिंब शेताच्या बांधावरच खरेदी करीत असून, तेथेच निवड पॅकिंग करून वजन करून निर्यात केली जाते. येथील युवा शेतकरी सुहास धोंडिभाऊ गावडे यांचे १८० रुपये प्रतिकिलो या भावाने डाळिंबाची विक्रमी दराने खरेदी झाली. एवढा सोन्याचा भाव प्रथमच मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

पाचशे एकर क्षेत्रावर चार लाख झाडे डाळीबाने बहरलेली असून, सरासरी २५ किलो उत्पादन निघाले तरी सरासरी १३० रुपये भागाप्रमाणे या गावात पाच हजार टन उत्पादन महिना भरात निघणार आहे. त्यातून ६५ ते ७० कोटीची उलाढाल होईल. टाकळी परिसरात निचरा होणाऱ्या जमिनी, मुबलक पाणी, उत्तम हवामान तसेच उत्तम व्यवस्थापन यामुळे डाळिंब पीक जोरदार आले. या वर्षी विक्रमी उलाढाल होणार आहे.
- कैलास गावडे, शेतकरी व डाळिंब मार्गदर्शक


डाळिंब बागेवर सिसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर
डाळिंबाला सोन्याचा बाजारभाव मिळू लागल्यामुळे डाळिंबाच्या फळांची चोरी होण्याची प्रामाणिक वाढले आहे त्यामुळे आम्ही डाळिंबाच्या बागेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, असे डाळिंब उत्पादक शेतकरी भानुदास किसन गावडे यांनी सांगितले.

टाकळ हाजी परिसरातील डाळिंबाचा दर्जा अंत्यत उत्तम असल्यामुळे त्याला बांगलादेश तसेच इतर देशातील ग्राहकांची मोठी मागणी असते. त्यामुळे येथील डाळिंब खरेदीसाठी व्यापारी स्पर्धा करतात.
- फय्याद अहमद, व्यापारी


दृष्टिक्षेपात
डांळिंब पीक - ८ x १३ अंतरावर लागवड
एकरी - ४०० झाडे
पिकाचा कालावधी - ९ महिने
एकरी खर्च - अडीच ते ३ लाख
प्रती झाड सरासरी -२५ प्रतिकिलो उत्पादन
एकरी उत्पन्न - १५ लाख

00178, 00179

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com