टाकळी हाजीच्या पोलिसांनी
ट्रकसह अवैध व्यवसायांवर कारवाई

टाकळी हाजीच्या पोलिसांनी ट्रकसह अवैध व्यवसायांवर कारवाई

टाकळी हाजी, ता. ३ : टाकळी हाजी चौकीच्या पोलिसांनी वाळूच्या ट्रकसह तीन अवैध दारूधंद्यावर कारवाई करून ॲक्शन मोडमध्ये आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
टाकळी हाजीसह शिरूरच्या पश्चिम भागात अवैध व्यवसायाबाबत ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध केली. त्या वृत्ताची दखल घेत सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मात्र, या कारवाईमध्ये सातत्य राहील का? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टी तसेच धाब्यावर सर्रास देशी-विदेशी दारूची विक्री केली जाते आहे. आण्णापुर, जांबुत पंचतळे येथे दोन धाब्यावर तसेच वडनेर येथे हातभट्टी विक्रेत्यांवर कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहे.
जांबुत पंचतळे (ता. शिरूर) अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रकवर कारवाई करीत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्यासह पोलिस कॉन्टेबल दीपक पवार, विशाल पालवे हे जांबुत पंचतळे परिसरात रविवारी रात्री गस्त घालत असताना त्यांना ट्रकमधून वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून ट्रक पकडला. ट्रकचालक नवनाथ रघुनाथ ढोकले (रा. खडकवाडी ता. पारनेर, जि अहमदनगर) यांच्या विरोधात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आमदाबाद फाटा येथे अवैध दारूची राजरोसपणे विक्री करीत आहेत. याबाबत उत्पादन शुल्क व पोलिस यांच्याकडे तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. मात्र, तक्रार करणाऱ्यांची नावे अवैध धंदेवाल्यांना सांगितले जातात. त्यामुळे सामान्य जनतेचा पोलिसांवरचा विश्वास कमी झाला आहे.
- योगेश थोरात, माजी सरपंच, आमदाबाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com