पुणे
टाकळी हाजी परिसरात बाजरी पिकाला फटका
टाकळी हाजी, ता. १५ : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात रविवारी (ता. १४) रात्री सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असून, खरिपाचे बाजरी पीक काही शेतकऱ्यांनी काढले आहे. अनेकांचे पिके शेतातच उभी आहे. सतत दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे बाजरी पिकाला त्याचा फटका बसणार आहे. मात्र, विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. तसेच, ऊस पिकालादेखील चांगला फायदा होईल, अशी आशा शेतकरी वर्गात आहे. पावसामुळे घोड व कुकडी नदी पाण्याने भरून वाहत आहे.