हवेलीत ग्रामपंचायतीच्या आरक्षणाने अनेकांची निराशा
थेऊर, ता. १३ : हवेली तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी (ता. ११) हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. १९९५ च्या आरक्षणाची वर्तुळाकार पद्धतीने अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाची फेरी पूर्ण करीत, लोकसंख्येचा निकष धरून व चिठ्ठी पद्धतीने काढलेली आरक्षणे जाहीर करण्यात आली आहेत.
हवेलीत नव्याने काढलेल्या आरक्षण सोडतीने, यापूर्वी निघालेल्या आरक्षणाने खुशीत असलेल्या प्रबळ दावेदारांची संधी हुकल्याने अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा पडली आहे. आता हे इच्छुक कोणती रणनीती अवलंबतात आणि कसे फासे टाकतात हे पहाणे औत्सुक्याचे असणार आहे. येनकेन प्रकारे ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी, काही मंडळींना जिवाचे रान करून उलट सुलट डाव प्रतिडाव टाकत करिष्मा दाखवावा लागणार आहे हे नक्की.
हवेलीतील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी जाहीर केली.
अनुसूचित जाती महिला : आंगळबे, खेडशिवापूर, हिंगणगाव, कदमवाकवस्ती, प्रयागधाम, शिंदेवाडी.
अनुचित जाती : खामगाव मावळ, कोरेगावमूळ, कोळेकरवाडी, रहाटवडे, केसनंद, वरदाडे.
नागरिकांचा मागासवर्ग महिला : वळती, जांभळी, आंबी, पेठ, वडकी, मरणेवाडी, शिवापूर, नायगाव, कोंढणपूर, कुडजे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : निरगुडी, शिंदवणे, गोऱ्हे बुद्रुक, मांडवी खुर्द, सोरतापवाडी, भावडी, डोंगरगाव, खामगाव टेक, गोगलवाडी.
सर्वसाधारण महिला : कल्याण, मांजरी खुर्द, घेरा सिंहगड, आळंदी म्हातोबा, लोणी काळभोर, तरडे, भवरापुर, उरुळी कांचन, खडकवाडी, आर्वी, गाऊडदरा, श्रीराम नगर, थेऊर, कोलवडी-साष्टे, न्हावी सांडस, आव्हाळवाडी, कुंजीरवाडी, सांगवी सांडस, मांडवी बुद्रुक, वडू खुर्द.
सर्वसाधारण : फुलगाव, वडगाव शिंदे, आहिरे, खानापूर, बकोरी, बिवरी, तुळापूर, पिंपरी सांडस, वाडेबोल्हाई, बहुली मालखेड, डोणजे, खोरेखुर्द, सोनापूर, शिरसवडी, बुर्केगांव, पेरणे, लोणीकंद, अष्टापूर, सांगरुण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.