कसबा पेठेतील महिला गोविंदांचा थेऊरमध्ये जल्लोष
थेऊर, ता. २६ : श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे छत्रपती सेवा संघाच्या वतीने आयोजित दहीहंडी, कसबा पेठेतील ‘श्री गणेश मित्र मंडळ’या महिला गोविंदा पथकाने फोडून, आपली वेगळी ओळख ग्रामीण भागात करून देत दहीहंडी उत्सवात रंगत आणली.
दहीहंडीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयासमोर पार पडला. यावेळी गावातील महिला, तरुणाई तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण गायिका खुशी शिंदे यांच्या बहारदार आर्केस्ट्राच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. दहीहंडीचे आकर्षण वाढवण्यासाठी १ लाख ११ हजार रुपयांचे पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य संजय काकडे यांनी जाहीर केले होते. सुरवातीला छत्रपती सेवा संघाच्या सदस्यांनी हंडीला सलामी दिली, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात महिलांच्या पथकाने यशस्वीरीत्या हंडी फोडली. हंडी फोडल्यानंतर आनंदाने जल्लोष करण्यात आला. तर मान्यवरांच्या हस्ते महिला गोविंदा पथकाला गौरविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष काकडे,संजय काकडे,सुजित काळे, योगेश काकडे,संकेत दळवी,हवेली आरपीआय अध्यक्ष मारुती कांबळे,आनंद वैराट, गणेश गावडे, युवराज काकडे, नवनाथ कुंजीर, प्रमोद राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती सेवा संघाचे अध्यक्ष सागर राजगुरू, ऋषी बिनावत, यशवंत बोराळे, निखिल काकडे, विशाल घाडगे, सुमीत विलास कुंजीर, विलास सोनवणे, संतोष खारतोडे, अविनाश भोसले, विजय पवार, मयूर कुंजीर, सचिन राऊत, राजू तांबे, चिंतामणी भोसेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
़़़़़़़़़़़़़़