पॉलीहाऊसच्या भिंतीमुळे आडला पाण्याचा स्रोत
थेऊर, ता.२१ : थेऊर (ता. हवेली) येथील राईज एन शाईन कंपनीच्या पॉलीहाऊस प्रकल्पाभोवती उभारलेल्या सिमेंट सीमा भिंतीमुळे परिसरातील नैसर्गिक पाण्याचा स्रोत अडविला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेत व घरांत पाणी साचले आहे. परिणामी दहा शेतकऱ्यांचे प्रत्येकी २ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एकूण नुकसान सुमारे २५ लाखांपर्यंत गेल्याचा अंदाज आहे. याबाबत संबंधितांनी अतिरिक्त तहसीलदार लोणी काळभोर यांना निवेदन देण्यात आले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले की, कंपनीने पाण्याचा निचरा होईल यासाठी कोणतीही पूर्वकल्पना वा व्यवस्था न करता विकासकामे केली. इतकेच नव्हे तर पॉलीहाऊसमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यासाठीही कोणतेही नियोजनबद्ध जलव्यवस्थापन अस्तित्वात नाही. त्यामुळे दरवर्षी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि शेतजमिनी तीन ते चार महिने पडीक राहतात.
दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करत मागणी केली आहे की, कंपनीने तत्काळ पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. कंपनी दडपशाही करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा असा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.
कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे.राईज एन शाईन कंपनीच्या सिमेंटच्या भिंतीमुळे पावसाचे सर्व पाणी त्या ठिकाणी अडवले जाते. त्यामुळे शेतीचे आणि उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. यामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर कुटुंबासहीत तहसील कार्यालयावर उपोषण करणार आहोत.
- प्रथमेश काकडे, नुकसानग्रस्त, शेतकरी
प्रथमेश काकडे व बंडू काकडे यांच्या याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून,प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा करून नुकसानीचा प्रस्ताव तहसील कार्यालयाला पाठवणार आहे.
- किशोर जाधव, मंडलाधिकारी थेऊर
00222
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.