उरुळीत अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी कामकाजाला मर्यादा
सुनील जगताप : सकाळ वृत्तसेवा.
उरुळी कांचन, ता. २५ : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे श्रेणी १ च्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाला तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय म्हणून दर्जा आहे. पण या ठिकाणी मंजूर तीन पदांपैकी फक्त दोनच कर्मचारी नियुक्त आहेत. पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने कामकाजाला मर्यादा आलेल्या आहेत.
पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत प्रशस्त आहे पण दुरुस्ती आणि रंगरंगोटीची अत्यंत गरज आहे. पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने असलेल्या यंत्रणेचा पुरेसा वापर करणे व पशुपालकांना त्याचा फायदा मिळत नाही. आपत्कालीन काळात फिरत्या मोबाईल दवाखान्याचा वापर केला जातो.
चिकित्सालयाच्या अंतर्गत येणारी गावे
उरुळी कांचन
टिळेकरवाडी
शिंदवणे
खामगाव टेक
प्रयागधाम
कोरेगाव मूळ
परिसरातील पशुधन
गाई...........४५६२
शेळी...........४२६२
मेंढी...........१८८३
म्हैस...........१०३०
यांची आहे गरज
- भौतिक सुविधांचा अभाव
- पाण्याची व्यवस्था
- स्वच्छतागृह
- रेबीज लसीचा साठा
- पुरेसा औषधसाठा
लसीकरण
लाळ्या खुरकूत.......४२१४
लंपी....... ३८००
आंत्रविषार ........... ४१४०
घटसर्प.......२०७०
फऱ्या.......९५
ता.१ एप्रिल ते १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची स्थिती
उपचार............५६२३
जंतरोग............९८०
गर्भ तपासणी............३१४
कृत्रिम रेतन............२५३
वंध्यत्व तपासणी............४६
फिरते पशुवैद्यकीय पथक...........१
दरमहा व्यापली जाणारी गावे गावे.................२० ते २५
पशुवैद्यकीय चिकित्सालयात औषधोपचार, कृत्रिम रेतन, खच्चीकरण, लसीकरण, जंतनाशकीकरण, गोचीड निर्मूलन, वंध्यत्व निवारण, शवविच्छेदन, शस्त्रक्रिया, एक्सरे, सोनोग्राफी, रक्त तपासणीला प्राधान्य दिले जाते.
दृष्टिक्षेपात दवाखाना
- शेतकरी प्रशिक्षण शिबिर
- राज्य शासन व केंद्र शासनाच्या योजनांची जागृती
- अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मार्गदर्शन
- मिनरल मिक्स्चर व विटा वाटप करणे
- मोबाईल व्हॅनच्या दर आठवड्याला वेगवेगळ्या गावांमध्ये दौरा
- गोठ्यावर जाऊन पशुधनाला आवश्यक ते उपचार
- मार्च ते सप्टेंबरदरम्यान १५० लाभार्थ्यांना ७३० किलो चारा
बियाणांचे वाटप
- एप्रिल - ऑक्टोबर कृत्रिम रेतनाचे २५३ लाभार्थी.
फिरत्या दवाखान्याद्वारे पशुधनांवर उपचार
दवाखान्यातर्फे सोमवार व गुरुवारी फिरत्या दवाखान्यातर्फे आळंदी म्हातोबा येथे पशुधन उपचाराचे केले जातात. वैद्यकीय अधिकारी डॉ.मंजूषा ढगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार व शुक्रवारी फिरता दवाखाना उरुळी कांचन परिसरातील पशुधनावरील औषधोपचाराचा कार्यक्रम राबवत असतो. तसेच बुधवार आणि शनिवार या दिवशी हा फिरता दवाखाना वडकी या केंद्रावर पशुधनावरील औषध उपचाराचा कार्यक्रम राबवीत असतो.
शासकीय योजना व लाभार्थी
- शेळी मेंढी वाटप योजना ...........११
- गाय /म्हैस वाटप योजना...........२
- एक दिवशीय कुक्कुट वाटप योजना ...........१००
पशुवैद्यकीय चिकित्सालय उरुळीकांचन हा तालुका स्तरीय दवाखाना असून, या दवाखान्यास अन्य सहा गावे जोडली आहेत. दवाखाना हा विस्तृत कार्यक्षेत्रात असून सर्व सुविधांनी पुरेपूर आहे. परंतु हा विस्तृत कारभार सांभाळ्यन्या करिता कर्मचारी वर्ग हा अपुरा असल्यामुळे अधिकाऱ्याची तारांबळ होते. म्हणून पशुवैद्यकीय दवाखान्यात पुरेसे मनुष्यबळ मिळाले तर पशुपालकांना आणखीन प्रभावीपणे सेवा पुरवण्यास मदत होईल.
- डॉ. मंजूषा ढगे, पशुवैद्यकीय अधिकारी
00423
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

