कदमवाक वस्ती येथील 
हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय

कदमवाक वस्ती येथील हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय

Published on

उरुळी कांचन, ता. २० : कवडीपाट (ता. हवेली) येथील टोल नाका येथे असलेल्या हॉटेल जयश्री एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट बार अँड लॉजिंगवर लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (ता. १९) सकाळी दहाच्या दरम्यान छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन दोन महिलांची सुटका केली आहे.
जयश्री एक्झिक्युटिव्ह येथे वेश्याव्यवसाय चालतो, अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक तयार करून पंचासह हॉटेल जयश्री एक्झिक्युटिव्ह येथे पाठवले. बनावट ग्राहकाने मॅनेजर मोहन कसनु राठोड (वय ५०, रा. श्री साई बिल्डिंग, फ्लॅट नंबर २०५, पाषाणकर बाग, लोणी काळभोर) यांच्याकडे महिलेची मागणी केली. ग्राहकाला होकार देत रूमभाडे १५०० रुपये सांगून रूम नंबर २०१ मध्ये पाठवले. तसेच, बनावट ग्राहकाकडून १०० रुपये घेऊन आरोपी गणेश दत्ता चिलकेवार (वय २५, रा. जयश्री लॉज स्टाफ रुम, कवडीपाट टोलनाका, लोणी काळभोर) याच्याकरवी कंडोम पाकीट पुरवले. त्यानंतर आरोपी राठोड याने पीडित महिलेला रूममध्ये पाठवले. तिने मॅनेजरच्या सांगण्यावरून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पाच हजार रुपये सांगितले. त्यानंतर बनावट ग्राहकाने तत्काळ छापा पथकाला फोनवर कल्पना दिली. छापा पथकाने कारवाई केली. त्यात एकूण ८४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल (रोख रक्कम, मोबाइल, कंडोम पाकीट) जप्त केले. आरोपींविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना अटक केली असून, पीडित महिलांची सुटका केली आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व सहकाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com