लोणी काळभोर येथे पाच एकर ऊस जळून खाक

लोणी काळभोर येथे पाच एकर ऊस जळून खाक

Published on

थेऊर, ता. २३ : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रायवाडी परिसरात तोडणीला आलेला पाच एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील ऊस आगीत भस्मसात झाला आहे.. ही घटना मंगळवारी (ता. २३) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेत सहा शेतकऱ्यांचे १० लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ४९२ व ४९३ मध्ये अशोक गेनबा गोते, गोविंद गोते, प्रभाकर अबू काळभोर, दत्तात्रेय अबू काळभोर,भगवान लक्ष्मण काळभोर व सचिन भगवान काळभोर यांची ऊसशेती आहे, सोमवार (ता. २२) पासून उसाची तोड करण्यासाठी ऊसतोड कामगार आले होते, एक ट्रॅक्टर ऊस सुद्धा गेला होता. काही नागरिकांनी सुरुवातीला अशोक गोते यांच्या उसाला आग लागल्याचे पाहिले. त्यानंतर ती आग शेजारील शेतकऱ्यांच्या उसाला लागली, बघता बघता पाच एकराहून अधिक ऊस अर्ध्या तासाच्या आत जाळून खाक झाला. ऊसतोड कामगाराने ओढलेली सिगारेट अथवा बिडीचा जळता तुकडा टाकल्यामुळे आग लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत जळून खाक झाल्याने हे सर्व शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अजून तक्रार दाखल झाली नाही. महसूल प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करावी. तर पोलिस प्रशासनाने आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

0536

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com