सहकार चळवळीमुळे जनसामान्यांची प्रगती : खामकर

सहकार चळवळीमुळे जनसामान्यांची प्रगती : खामकर

Published on

उरुळी कांचन, ता.१२ : ‘‘सहकारामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास झाला आहे. जनसामान्यांची प्रगती झाली आहे,’’ असे मत महाराष्ट्र प्रदेशचे साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर यांनी व्यक्त केले.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथे सहकार भारतीच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खामकर यांनी नुकताच उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सहकारामुळे महाराष्ट्र समृद्ध झाला असून सहकारातील काही दोष निवारण्याचे दृष्टीने सहकार भारतीचे ‘बिना संस्कार,नही सहकार’ हे ब्रीद वाक्य रुजविण्याची नितांत गरज आहे.
यावेळी बोलताना रावळगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी सांगितले की, सहकार क्षेत्रातील सर्व उद्योग हे व्यावसायिक पद्धतीने चालविले पाहिजेत तसेच विशेषतः साखर उद्योगावरील काही नियंत्रणात सरकारकडून शिथिलता आणली पाहिजे.
दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी पुणे महानगर साखर कारखाना प्रकोष्ठ समन्वयक बाळ भिंगारकर यांनी प्रास्ताविक केले. केंद्र सरकारचे धर्तीवर राज्य सरकार नवीन सहकार धोरण आणणार असून, या समितीमध्ये सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री विवेक जुगादे यांचा पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आबासाहेब शिंगोटे, शहाजीराव बोरूडे, नवदीप सोशल फाउंडेशनचे सचिव प्रताप खामकर, प्रा. गहिनीनाथ हुमे, रवींद्र साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे जिल्हा पतसंस्था प्रकोष्ठ सहप्रमुख विनोद अष्टुल यांनी आभार मानले.

00638

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com