निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 
हवेलीत आयटी सेल सज्ज

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हवेलीत आयटी सेल सज्ज

Published on

उरुळी कांचन, ता. ३ ः आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हवेलीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यालयात संगणक, एसएमएस नियंत्रण, संपर्क (आयटी सेल) प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि तंत्रज्ञानस्नेही करण्याच्या उद्देशाने या कक्षामार्फत विविध महत्त्वाची कामे राबवली जात आहेत.
या आयटी सेलमध्ये शुभम वाबळे, अभिषेक धुमाळ, अक्षय ओव्हाळ, गणेश शिसोदे, मयूर शेवाळे, विनायक शिंदे आणि वैभव मोटे यांचा समावेश असून सर्वजण निवडणूक प्रक्रियेसाठी तांत्रिकदृष्ट्या समन्वय साधण्याचे काम करत आहेत. आयटी सेलमार्फत जिल्हा निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळांचे नियमित अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. त्यासोबतच स्थानिक निवडणूक विषयक बातम्या, छायाचित्रे व आवश्यक माहिती वेळेत केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या विविध निवडणूक अॅप्लिकेशन्सची अंमलबजावणी करून त्यांचा वापर सुलभ व्हावा यासाठी संबंधितांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक संगणक, इंटरनेट सुविधा, सॉफ्टवेअर व अन्य तांत्रिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम आयटी सेलकडून केले जात आहे. मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगसाठी मतदान केंद्रांची यादी निश्चित करणे, आवश्यक तांत्रिक नियोजन करणे तसेच मतदानाच्या दिवशी थेट नियंत्रणासाठी स्वतंत्र स्क्रीन, टीव्ही व इंटरॲक्टिव्ह पॅनलची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदाना पूर्वी व मतदानाच्या दिवसा दरम्यान नियंत्रण, समन्वय व माहितीसाठी मोबाइल व वेब आधारित अॅप्सचा वापर करण्यात येत असून ईव्हीएम, कायदा व सुव्यवस्था विषयक माहिती संकलन व अहवाल सादर करण्याचे काम सुरू आहे. तसेच ईव्हीएम स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी व फोटोग्राफीची व्यवस्था करून रेकॉर्डिंग व बॅकअप सुरक्षितपणे जतन करण्यात येत आहे. याशिवाय कम्युनिकेशन (संपर्क) रूम स्थापन करून संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली असून मतदार यादी, मतदार नाव शोध व निवडणूक विषयक सर्व सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन आयटी सेलमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे हवेली तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह ठरण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com