उरुळी कांचन येथे पोलिसांचे पथ संचलन
उरुळी कांचन, ता. ५ : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उरुळी कांचन येथे गुरुवारी (ता.५) सकाळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या नेतृत्वात पथ संचलन घेण्यात आले.
उरुळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारी म्हणून उरुळी कांचन पीएमटी चौक, आश्रम रस्ता, जय मल्हार रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, सटवाई चौक, महात्मा गांधी विद्यालय, तळवाडी चौक ते शेवट पीएमटी चौक मार्गे पोलिस ठाणे असे पथ संचलन आयोजित केले होते. या पथ संचलनात एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एक पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षक, ३० पोलिस अंमलदार असे पोलिस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. हे पथ संचलन शांततेत व यशस्वीरीत्या पार पडला.
00727
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

