तब्बल साडेपंधरा किलो कटला माशाची विक्री

तब्बल साडेपंधरा किलो कटला माशाची विक्री

Published on

उरुळी कांचन, ता. ५ : उरुळी कांचनमधील (ता. हवेली) मच्छीबाजारात १५ किलो ६०० ग्रॅम वजनाचा कटला जातीचा मासा विक्रीसाठी आला होता. उरुळी कांचनजवळील पिंपरी सांडस या गावातून भीमा नदी वाहते. या नदीपात्रात स्थानिक मच्छीमाराच्या जाळ्यात तो अडकला. मच्छीमाराने
दिलेल्या माहितीनुसार, या जातीचा मासा नदी परिसरात चुकून आढळतो. या भागात जास्त करून मांगूर जातीचेच मासे आढळतात. पण बुधवारी (ता.४) साडेपंधरा किलो वजनाचा आणि तोही कटला जातीचा मासा मिळून आल्याने आश्चर्य वाटत आहे. मच्छीमाराने तो उरुळी कांचन येथील विक्रेते भगवान जाधव यांच्या दुकानात आणून दिला. या माशाला बघायला लोकांनी गर्दी केली होती. दरम्यान, हा कटला मासा खरेदी करून बिहारी लोकांनी एक वेगळा आनंद साजरा केला. माशाला सर्वाधिक असा ३२० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला, अशी माहिती भगवान जाधव यांनी दिली.
00874

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com